Manoj Jarange : मराठा आंदोलनाचा सरकारला धसका! चार जणांचं शिष्टमंडळ पुन्हा जरांगेंच्या भेटीला

अंतरवाली सराटी येथे सरकारच्या वतीने चार जणांचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी जाणार असल्याची माहिती आहे. शनिवार, दि. २३ डिसेंबर रोजी बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांची सभा होत आहे.
manoj jarange
manoj jarangeesakal
Updated on

अंतरवाली सराटीः जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी येथे सरकारच्या वतीने चार जणांचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी जाणार असल्याची माहिती आहे. या शिष्टमंडळामध्ये मंत्री उदय सामंत, मंत्री गिरीश महाजन, मंत्री संदीपान भूमरे आणि बच्चू कडू यांचा समावेश असणार आहे.

शनिवार, दि. २३ डिसेंबर रोजी बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांची सभा होत आहे. १७ तारखेला अंतरवाली सराटी इथं झालेल्या बैठकीमध्ये बीडच्या सभेविषयी जरांगेंनी सांगितलं होतं. पुढील आंदोलनाची दिशा बीडमध्ये ठरणार आहे. त्यामुळे बीडच्या सभेकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

१७ तारखेपूर्वीच मंत्री गिरीश महाजन आणि संदीपान भूमरे यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली होती. परंतु मुख्यमंत्र्यांनी फेब्रुवारीमध्ये आरक्षण देण्याचा शब्द दिल्याने आंदोलन होणार, हे दिसून येत आहे.

manoj jarange
अभिमानास्पद! कोल्हापुरातील प्रसिद्ध कादंबरीकार कृष्णात खोत यांच्या 'रिंगाण'ला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर

सरकारने संभाव्य मराठा आंदोलनाचा धसका घेतल्याने गुरुवारी पुन्हा एक शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार आहे. अंतरवाली सराटी येथे मंत्रा उदय सामंत, गिरीश महाजन, संदीपान भूमरे आणि बच्चू कडू हे जरांगेंची भेट घेऊन त्यांना आणखी वेळ मागतील, अशी शक्यता आहे. 'एबीपी माझा'ने हे वृत्त दिले आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्राबाबत आणखी एक मागणी केली आहे. रक्ताच्या नात्यात प्रमाणपत्र द्यावेत, आई कुणबी असेल तर मुलालादेखील प्रमाणपत्र मिळाले पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे. त्याशिवाय मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी प्रलंबित आहे. त्या मुद्द्यांवर गुरुवारी सायंकाळी मंत्र्यांसोबत चर्चा होऊ शकते.

manoj jarange
Maharashtra Politics : महाराष्ट्रात पुढे काय होईल? भाजप-RSS बैठकीबद्दल जितेंद्र आव्हाडांचा 'एक्स'वर मोठा गौप्यस्फोट

दरम्यान, जरांगे पाटलांच्या बीडच्या सभेकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. त्या सभेत ते कुणाचा समाचार घेतात, हे पाहाणं महत्त्वाचं आहे. बीडमध्ये सभेसाठी मोठ्या प्रमाणावर तयारी सुरु असल्याचं दिसून येतंय. पुढील आंदोलनाची दिशा २३ तारखेला निश्चित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.