कोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती (Yuvraj Sambhaji Raje Chhatrapati)मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) भेट घेण्यासाठी मुंबईला रवाना झाले आहेत. कोल्हापूरात झालेल्या मराठा मुक आंदोलनाचे परिणाम दिसत आहेत. सरकारने समाजाच्या मागण्याबाबत पहिले सकारात्मक पाऊल उचलले आहे. विचारविनिमय करण्यासाठी आज निमंत्रित केले आहे. मराठा समाजाच्या वतीने राज्य समन्वयक व मी आज बैठकीला जाणार आहोत. समाजाच्या न्याय व हक्कासाठी कसलीही तडजोड नाही. असे ट्विट आज खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे.(maratha-reservation-sambhajiraje-chhatrapati-meeting-in-mumbai-uddhav-thackeray)
मराठा आरक्षण आणि समाजाच्या अन्य मागण्यांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलाविली आहे. आज सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या या बैठकीत खासदार संभाजीराजे यांच्यासह मराठा समन्वयक सहभागी होणार आहेत. बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, गृहराज्यमंत्री सतेज पाटील उपस्थित असणार आहेत. संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात काल मूक आंदोलन झाले.
खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी मांडलेल्या मागण्यां संदर्भात राज्य सरकार सकारात्मक असून, संभाजीराजे यांनी उद्या (ता. १७) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा करावी, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी सकल मराठा समाजातर्फे नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्मारक परिसरात आयोजित मूक आंदोलनात केले होते.
संभाजीराजे यांनी राज्यभरातील समन्वयकांशी चर्चा करून मुख्यमंत्र्यांची भेट घेतली जाईल, असे जाहीर केले. त्याचबरोबर सरकारने मागण्या मान्य न केल्यास पुणे ते मुंबई मंत्रालय लाँग मार्च अटळ असल्याचा इशाराही दिला. संभाजीराजे यांनी यापूर्वीच शासनाकडे पाच मागण्या केल्या आहेत. त्याबाबत मुख्यमंत्री कोणती भूमिका घेणार, याची उत्सुकता आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.