Maratha Reservation : महाजन बोलत असताना गोंधळ; जरांगे कार्यकर्त्यावर भडकले; नेमकं काय घडल?

Maratha Reservation
Maratha Reservation
Updated on

मुंबई - मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असलेल्या आंदोलकांवर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज झाला. या लाठीचार्जपासून आंदोलन मोठ्या प्रमाणात चिघळलं आहे. त्यामुळे मंत्र्यांकडून सध्या उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज मंत्री आणि भाजपचे संकटमोचक म्हणून परिचीत असलेले गिरीश महाजन जालन्यात दाखल झाले होते. यावेळी झालेला गोंधळ जरांगे पाटील यांनी आक्रमकतेने हातळल्याचं पहायला मिळालं.

Maratha Reservation
एका ओळीचा काय? आम्ही पानभर अध्यादेश काढू, पण...; मराठा-कुणबी मुद्दावर महाजन यांचं विधान

यावेळी गिरीश महाजन यांच्यासोबत मंत्री संदीपान भुमरे, अतुल सावे, अर्जुन खोतकर उपस्थित होते. अर्धा तास चर्चा केल्यानंतरही तोडगा निघाला नाही. यावेळी गिरीश महाजन बाजू मांडत होते. त्याचवेळी एक उतावीळ आंदोलक महाजन यांच्याविरोधात घोषणा देण्याचा प्रयत्न करत होता. यावरून मनोज जरांगे संतप्त झाले होते.

Maratha Reservation
Maratha Reservation: एक महिन्याचा वेळ कशाला हवा? ४ दिवसांचा वेळ पुरेसा; मनोज जरांगे उपोषणावर ठाम

कार्यकर्त्याने घोषणाबाजी केल्यानंतर जरांगे पाटील संतप्त झाले. ते म्हणले की, तुमच्या गोंधळामुळे आरक्षण रेंगाळलं आहे. तुम्ही हुशार आहात, तर एवढे दिवस कुठं गेले होते. तुमचं वय ६० वर्षे दिसत. एवढे दिवस कुठं होते. आम्ही तुमच्यासाठीच जीव जाळत आहोत. मी तुम्हाला आरक्षण मिळवून देईल, अशा शब्दात जरांगे पाटील यांनी उतावीळ कार्यकर्त्याला फटकारलं. मराठा समाजातील मुलांचे मुडदे पडायला नको, म्हणून आम्ही रात्र-दिवस लढत असल्याचं पाटील यांनी म्हटलं.

याआधीही काही नेते आंदोलनस्थळी गेले असताना कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली होती. त्याचे काही व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र आता जरांगे पाटील यांनी अशा घटना रोखण्यास सुरुवात केल्याचं चित्र आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.