Maratha Reservation: "शरद पवार म्हणाले होते आरक्षण देऊ शकत नाही"; सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?

Maratha Reservation
Maratha Reservation
Updated on

Maratha Reservation:  मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन सुरु आहेत. मनोज जरांगे ९ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक घेऊन देखील मराठा आरक्षणाचा मुद्दा सुटला नाही. सरकारला कोणताही ठोस निर्णय घेता आला नाही. मराठा आरक्षण प्रकरणी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका होत आहे. दरम्यान या सर्व प्रकरणावर राज्याचे वनमंत्री व सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भूमिका मांडली आहे.

मराठा बांधवांना न्याय देण्याची सरकारची भूमिका आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण दिले देखील होते. मात्र हे आरक्षण टिकले नाही. मात्र मधल्या काळात २ वर्ष ८ महिने हा ग्रहण काळ होता. अशुभ घटना घडल्या. मराठा बांधवांचे आरक्षण टिकवण्यात अपयश आले. यावेळी वकील देखील बदलण्यात आले. अशा परिस्थीत कोर्टात बाजू मांडण्यात सरकार कमी पडलं, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. ते माझा कट्ट्यावर बोलत होते.

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आरक्षण देण्याच्या बाबतीत साकारात्मक आहेत. आज आरक्षण द्यावे असं म्हणणारे काही राजकीय पक्षाचे नेते आहेत त्यांचा इतिहास बघितला तर त्यांची भूमिका होती की मराठा आरक्षण आम्ही देऊ शकत नाही. शरद पवार असं म्हणाले होते. यामुळे शालिनीताई पाटील यांना पक्षातून बाहेर निघावं लागलं.

Maratha Reservation
MP Assembly Election 2023: गड कोण राखणार... ज्योतिरादित्य की दिग्विजय सिंह? भाजप अन् काँग्रेसमध्ये पराकोटीचा संघर्ष

१ मे १९६० पासून ही मागणी आली. यावेळी सगळीकडे काँग्रेसची सत्ता होती. तेव्हा कोणी काही बोललं नाही. हा मुद्दा आज आला, आज आरक्षण मागितलं असं नाही आहे. इतके वर्ष काँग्रेसचं सरकार पण प्रश्न का सुटला नाही?, असा प्रश्न सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मात्र काही लोक आंदोलनाच्या पाठीशी लपून अस्तिरता निर्माण व्हावी असं काही करत असेल. हिंसा कदीपी मान्य होणार नाही.

Maratha Reservation
"चूक पोलिसांची अन् खापर आमच्या माथी..."; श्रीकांत शिंदेंचे ठाणे पोलीस आयुक्तांना संतापजनक पत्र! काय आहे प्रकरण?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.