Maratha Reservation Survey: मराठा सर्वेक्षणातील गोंधळाचा व्हिडीओ व्हायरल! पहिली पास अधिकारी आला सर्वेक्षणासाठी अन्...

Maratha Reservation Survey: मराठा समाजाच्या सर्वेक्षणावेळचा सावळा गोंधळ समोर आला आहे. अहमदनगरमध्ये मराठा सर्वेक्षणातील गोंधळाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
Maratha Reservation Survey
Maratha Reservation SurveyEsakal
Updated on

मराठा समाजाच्या सर्वेक्षणावेळचा सावळा गोंधळ समोर आला आहे. अहमदनगरमध्ये मराठा सर्वेक्षणातील गोंधळाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. टिव्ही रिपोर्टनुसार या व्हिडीओमध्ये मराठा युवकांनी सर्वेक्षण न करता येणाऱ्या अधिकाऱ्याचा व्हिडीओ शुट करून व्हायरल केला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधील व्यक्ती हा सर्वेक्षण करणारा आहे मात्र, त्याला मोबाईल आणि सर्वेक्षणाचे अॅप वापरता येत नाही असं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

Maratha Reservation Survey
Talathi Bharti Result: तलाठी परीक्षेची निवड यादी जाहीर, पण 'या' १३ जिल्ह्यांचा निकाल मात्र रखडला

दरम्यान, मराठा समाजाकडून या घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्याचबरोबर या सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये काय आहे?

मराठा समाजाचा व्यक्ती- तुमचं नाव सांगा

अधिकारी- मनोज काशिनाथ कांबळे, मी मराठा सर्वेक्षणासाठी आलो आहे.

मराठा समाजाचा व्यक्ती- (अधिकाऱ्याला प्रश्न करतो) आपण कुठे आहात कामाला?

अधिकारी- महानगरपालिका केडगाव

मराठा समाजाचा व्यक्ती- मराठा सर्वेक्षणासाठी आपली काही ट्रेनिंग झाली आहे का?

अधिकारी- ट्रेनिंग झाली आहे. पण, माझं शिक्षण कमी असल्याने मला यातील जास्त काही माहिती नाही. त्यामुळं मी एक जोडीदार घेतला, त्याकडून मी अशी माहिती भरून घेतो.

मराठा समाजाचा व्यक्ती- हा तुमचा जोडीदार आहे का?

अधिकारी- हो

Maratha Reservation Survey
Manoj Jarange Patil Mumbai: मराठा आंदोलकांचा अशा प्रकारे होणार नवी मुंबईत पाहुणचार; झाली जंगी तयारी!

मराठा समाजाचा व्यक्ती- या सर्वेमध्ये तुम्ही कोणती माहिती घेत आहात.

अधिकारी- नाव, नंबर, आधार कार्ड अशी माहिती घेतो.

मराठा समाजाचा व्यक्ती- बाकीची माहिती? घर आहे का? काय काम करतो? व्यवसाय काय आहे?

अधिकारी- मला तर यातील जास्त काही कळत नाही.

मराठा समाजाचा व्यक्ती- आपण पालिकेत कोणतं काम करता?

अधिकारी- इलेक्ट्रिक मदतनीस

मराठा समाजाचा व्यक्ती- या सर्वेची तुम्हाला ट्रेनिंग दिली आहे का?

अधिकारी- ट्रेनिंग दिली आहे. पण, मला यातला काही अनुभव नाही, शिक्षण पात्रता नसल्यामुळे.

मराठा समाजाचा व्यक्ती- हा सर्वे मोबईल वरती आहे. तुम्हाला मोबाईल हाताळता येतो का?

अधिकारी- नाही येत

मराठा समाजाचा व्यक्ती- तुम्हाला मोबाईल हाताळता येत नाही मग तुम्ही सर्वेक्षण कसं करणार?

अधिकारी- मी हे आधिकाऱ्यांनाही सांगितलं, मला यातलं काही जमतं नाही, त्यावर त्यांनी सांगितलं आता ते माझ्याकडे नाही, तुम्ही तुमचं बघा. कोणीही जोडीदार घ्या आणि काम करा.

मराठा समाजाचा व्यक्ती- ही मोठी जबाबदारी आहे. मराठा समाजाचं आरक्षण तुमच्या या सर्वेवर अवलंबून आहे. चुकीच्या पध्दतीने सर्वे झाला तर आम्हाला आरक्षण कसं मिळेल जे आमच्या हक्काचं आहे.

अधिकारी- साहेब, मला यातील अनुभव नाही, माझं शिक्षण नाही. मी पहिली पास आहे.

Maratha Reservation Survey
Maratha Reservation : पुण्यातील रस्त्यांवर जनसागर; राज्य सरकार सावध, मराठ्यांची लाट मुंबईच्या दिशेने

अत्यंत धक्कादायक असा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ नगर जिल्ह्यातील आहे. यामुळे मराठा समाजाकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.