Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आज अधिवेशन

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी उद्या (ता. २०) विशेष अधिवेशन होत आहे.
Maratha Reservation
Maratha Reservationsakal
Updated on

मुंबई - मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी उद्या (ता. २०) विशेष अधिवेशन होत आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने केवळ दहा दिवसांच्या अवधीमध्ये राज्यात केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मांडणार आहेत. या अहवालाच्या आधारे मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण दिले जावे अशी शिफारस केली जाणार आहे.

सभागृहाचे कामकाज उद्या सकाळी सुरू होण्यापूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वेक्षणाचा अहवाल मांडला जाणार असून, मराठा समाजाला किती टक्के आरक्षण दिले जावे याची शिफारस मंत्रिमंडळ करणार आहे. यापूर्वी गायकवाड आयोगाने शिक्षणात १२ टक्के आणि सरकारी सेवेत १३ टक्के आरक्षणाची शिफारस केली होती.

शुक्रे आयोगाच्या अहवालाच्या आधारेही मंत्रिमंडळ १३ टक्क्यांच्या आतमध्येच मराठा आरक्षणावर शिफारस करण्याची दाट शक्यता आहे. एका बाजूला मराठा आरक्षण दिले जाण्यासाठी महत्त्वाचे पाऊल राज्य सरकारने उचलले असताना दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सर्व मराठा हे कुणबी असून त्यांना ओबीसी समाजातून आरक्षण मिळावे यासाठी लढा उभारला आहे. त्यामुळे राज्य सरकारला उद्या मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाला सभागृहात सामोरे जावे लागू शकते.

नवीन वर्षातील हे पहिलेच अधिवेशन असल्याने अधिवेशनाची सुरुवात राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने होणार आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल उद्या सभागृहात मांडला जाईल. यापूर्वी गायकवाड आयोगाच्या अहवाल शिफारशींसह दोन्ही सभागृहांनी पूर्णपणे स्वीकारला होता. उद्या सादर होणार शुक्रे समितीच्या अहवालाला देखील पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.

मात्र मराठवाडा बरोबरच राज्यात इतरत्र कुणबी नोंदी शोधण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेली माजी न्या. संदीप शिंदे समिती, जात पडताळणी अधिनियमात बदल करून त्यामध्ये सग्यासोयऱ्यांचा समावेश करण्यासाठी प्रसिद्ध केलेली अधिसूचना याचे देखील पडसाद उद्या सभागृहात उमटण्याची शक्यता आहे.

‘इतरांच्या आरक्षणाला धक्का नाही’

जुन्नर - ‘ओबीसी किंवा इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता, तसेच इतर कोणाचेही नुकसान न करता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अधिवेशन बोलविण्यात आले आहे,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किल्ले शिवनेरी (ता. जुन्नर) येथे आज केले. शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने किल्ले शिवनेरीवर मराठा सेवा संघाच्या अभिवादन सभेत मुख्यमंत्री शिंदे यांनी आरक्षणाबाबतची भूमिका मांडली.

दरम्यान, सभेपासून जवळच असलेल्या शिवकुंज वास्तूजवळ सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. शिवजन्म सोहळ्यानंतर प्रथेप्रमाणे शिवकुंजमधील बाल शिवाजी व जिजाऊ मातेस मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दरवर्षी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतात. या वेळी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाल्याने त्यांनी येथे येण्याचे टाळले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()