Maratha Reservation Case: 'मराठा आरक्षणासंदर्भात भरती, दाखले कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून', उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला स्पष्ट निर्देश

मराठा आरक्षणाविरोधात सदावर्तेंनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी पार पडली.
Maratha Reservation
Maratha Reservationsakal
Updated on

Maratha Reservation: मराठा आरक्षण कायद्याला विरोध करणाऱ्या याचिकेवर उच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली आहे. याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते यांनी याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती उच्च न्यायालयाला बुधवारी केली होती. ही सुनावणी मंगळवारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

यावेळी मराठा आरक्षणानुसार कोणतीही भरती किंवा शैक्षणिक दाखले देताना ते न्यायालयाच्या निर्णयावर अंवलबून असतील हे लक्षात ठेवा असं न्यायालयाने राज्य सरकारला बजावलं आहे. या सुनावणीवेळी मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला स्पष्ट निर्देश दिले आहेत.

Maratha Reservation
Uddhav Thackeray: "महिला शक्तीनं देशातील हुकुमशहा संपवावा"; उद्धव ठाकरेंचं महिला दिनी आवाहन

राज्य सरकारनं नव्यानं जाहीर केलेली भरती प्रक्रिया आणि शैक्षणिक दाखल्यांच्या जाहिराती विरोधात डॉ. जयश्री पाटील यांची हायकोर्टात दिवाणी रिट याचिका दाखल केली आहे. या याचिकांवरही इतरांसोबत सुनावणी घ्यायची की तातडीचा दिलासा देण्याकरता स्वतंत्र सुनावणी घ्यायची याचा निर्णय पुढील आठवड्यात होणार आहे.

Maratha Reservation
Maharashtra Politics: रामदास कदमांच्या मुलाची अध्यक्षपदी केलेली नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात? कोणी केले आरोप, वाचा सविस्तर

सदावर्ते यांनी बुधवारी मराठा आरक्षणाविरोधातील याचिका न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठासमोर सादर केली होती. तसेच, याचिकेवर तातडीने सुनावणी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले होते.

मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर राज्यातील आरक्षणाने ५० टक्क्यांचा टप्पा ओलांडल्याचेही त्यांनी न्यायालयाला सांगितले. मराठा आरक्षणामुळे राज्यात सद्यस्थितीला भरती प्रक्रियेत खुल्या प्रवर्गासाठी केवळ ३८ टक्के जागा राहणार असल्याचेही त्यांनी न्यायालयाला सांगितले, त्यावर आज सुनावणी पार पडली.

Maratha Reservation
मराठा तरुणांना १० टक्के आरक्षण कधी? पोलिस भरती अर्जाची मुदत २५ दिवस अन्‌ जात प्रमाणपत्र मिळते ४५ दिवसांत; सेतू केंद्रांना टाळे तर ५६६ ‘सीएससी’ केंद्रे बंद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.