Maratha Reservation: मराठा समाजाच्या मृतदेहावर आरक्षण ठेवणार का?; उद्धव ठाकरेंचा संतप्त सवाल

Maratha Reservation
Maratha Reservation
Updated on

Maratha Reservation: ‘मराठा समाजाच्या मृतदेहावर आरक्षण ठेवणार काय’, असा सवाल ठाकरे गटाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी आज एक निवेदन जारी केले असून त्यांनी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला ताबडतोब आरक्षण देण्याचे आवाहन केले आहे.

मनोज जरांगेंच्या जिवाशी खेळत राज्य सरकार महाराष्ट्राच्या सामाजिक एकतेला चूड लावत असल्याचा आरोप केला आहे.

या निवेदनात उद्धव ठाकरे म्हणतात, "मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत आहे. सरकार त्यांच्या जिवाशी खेळण्याचे राजकारण करीत असेल तर महाराष्ट्राच्या सामाजिक एकतेला ते चूड लावीत आहे. मराठा समाज त्यांचे हक्क मागत आहे व ते त्यांना मिळायला हवेत.

Maratha Reservation
कोकण रेल्वे प्रशासनातर्फे तीन तासांचा मेगा ब्लॉक

ओबीसी, आदिवासींसह इतर समाजाच्या हक्कांना धक्का न लावता मराठा, धनगर समाजाला त्यांचे हक्काचे टिकणारे आरक्षण मिळायला हवे. जरांगे पाटील उपोषण करीत आहेत पण आरक्षणासाठी लोक रोज आत्महत्या करीत आहेत.

समाजाच्या मृतदेहांवर आरक्षणाचा आदेश सरकार ठेवणार आहे काय? सरकार मन की बात करत आहे पण त्यांचे मन निर्दय आहे. जरांगे पाटील यांचे प्राण वाचविण्याची त्यांची भूमिका दिसत नाही," या निवेदनावर सरकारने प्रतिक्रिया देते काय याकडे ठाकरे सेनेचे डोळे लागले आहेत.

Maratha Reservation
Latur : बाळांनो मला माफ करा तुमच्यासाठी मी काही करू शकलो नाही" चिठ्ठी लिहून गोद्रीत मराठा आरक्षण व निसर्ग साथ देत नसल्याने तरुणाची आत्महत्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.