Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट! राज्य सरकारकडून शिंदे समितीला मुदतवाढ

Maratha Reservation
Maratha Reservation
Updated on

Maratha Reservation: महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा संघर्ष निर्माण झाला आगे. गेल्या महिन्यात जालन्यात आरक्षणाबाबत आंदोलन सुरू असताना 24 ऑक्टोबरपर्यंत मागण्या पूर्ण करण्याचा अल्टिमेटम देण्यात आला होता. मात्र आजपर्यंत या मागण्यांवर सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरंगे पाटील पुन्हा एकदा बेमुदत उपोषण बसले आहेत. त्यामुळे राज्यसरकारच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मनोज जरांगे यांच्याकडे सरकारने दोन महिन्यांचा वेळ मागितला होता. मात्र आता एक घंटा देखील मिळणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.  तर कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात नेमण्यात आलेल्या माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने देखील आणखी वेळेची मागणी केली आहे. (Latest Marathi News)

दरम्यान एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारने शिंदे समितीला अहवाल सादर करण्यासाठी २४ डिसेंबपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामुळे आता मनोज जरांगेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच राज्य सरकारने तेलंगणा सरकारकडून निजामकालीन नोंदी व कागदपत्रे लवकर मिळावीत, यासाठी राज्य सरकारने तेलंगणा सरकारसोबत पत्रव्यवहार केला आहे.

Maratha Reservation
IMC 2023 : काय आहे 'इंडिया मोबाईल काँग्रेस'? आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन

महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये  राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधींना प्रवेशबंदी केली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मंगळवारी दसरा मेळाव्यात हा मुद्दा उपस्थित केला. उद्धव ठाकरे म्हणाले, "सरकारने मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर दगडफेक आणि लाठीचार्ज केला. मी मुख्यमंत्री असतानाही मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू होते किंवा हा मुद्दा तसाच उभा होता, पण कुणी लाठीचार्ज झाला का?. दम असेल मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवाव."

Maratha Reservation
Tiger Claw Row: मशिदी अन् दर्ग्यांमध्ये मोराची पिसे, तिथेही छापे टाका; भाजप आमदाराची मागणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.