Maratha Reservation : मनोज जरांगेंनी मराठा समाजाचा मान राखला; घेतला 'हा' मोठा निर्णय

Maratha Reservation
Maratha ReservationSakal
Updated on

मराठा आंदोलनासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला राज्यात अनेक ठिकाणी हिंसक वळण लागल्याच्या घटना समोर आल्या होत्या. दरम्यान अंतरवली सराटी येथे सुरु असलेल्या मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. जरांगे यांनी अन्न-पाणी यासोबतच वैद्यकीय उपचार घेण्यास देखील नकार दिल्याने त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालवत चालली होती. यानंतर त्यांनी किमान पाणी तरी घ्यावं अशी विनंती मराठा समाजाच्या वतीने सातत्याने करण्यात येत होती. अखेर जरांगे यांनी मराठा समाजाचा मान ठेवला आहे.

अन्न-पाणी घेणं बंद केल्याने तब्येत खालावल्यानंतर काल मराठा आंदोलकांच्या विनंतीचा मान राखत मनोज जरांगे यांनी काही घोट पाणी घेतलं होतं. त्यानंतर जनतेच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील यांनी पाणी पिऊन उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Maratha Reservation
Maratha Reservation: मालमत्तेच नुकसान करणाऱ्यांना अटक करुन गुन्हे दाखल करा; गृहमंत्र्यांच्या सुचना

आज (मंगळवार) थोड्याच वेळापूर्वी फोनवरून मुख्यमंत्री एकनाथ शिेंदे आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये चर्चा झाली. त्यानंत जरांगे हे थोड्या वेळात मराठा अभ्यासकांना बोलावणार आहेत आणि त्यांच्याशी चर्चा करून पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ यांच्याशी बोलणार आहेत. त्यामुळे आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काय तोडगा काढला जातो याकडे राज्यातील जनतेच्या नजरा लागल्या आहेत.

Maratha Reservation
Maratha Reservation : तोडगा निघणार? मुख्यमंत्री शिंदे मनोज जरांगे पाटील यांच्यात फोनवर 24 मिनिटे चर्चा

एकीकडे मनोज जरांगे-पाटील यांचे उपोषण सुरू आहे. दुसरीकडे राज्यातील बीड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांत काल (३० ऑक्टोबर) मोठ्याप्रमाणात तोडफोड करण्यात आली. माजलगाव येथे राष्ट्रवादी आमदार प्रकाश सोळंखे यांच्या घरावर दगडफेक करत जाळपोळ करण्यात आली.

यानंतर बीड शहरातील नगर रोडवरील आमदार संदीप क्षीरसागर आणि नेते जयदत्त क्षीरसागर राहत असलेल्या बंगल्याला आग लावण्यात आली. यानंतर बीड जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. राज्यात अनेक ठिकाणी एसटी बसेसची देखील तोडफोड करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.