Maratha Reservation : आग लावली तेव्हा क्षीरसागरांच्या बंगल्यात कोण होतं?, कुटुंबातील सदस्य 'असे' पडले बाहेर

धुराच्या नळकांड्या फोडल्याने वाचला पंडितांचा बंगला, क्षीरसागरांच्या दारातील दोन कुत्र्यांचा होरपळून मृत्यू
Maratha Reservation : आग लावली तेव्हा क्षीरसागरांच्या बंगल्यात कोण होतं?, कुटुंबातील सदस्य 'असे' पडले बाहेर
Updated on

बीड : शहरात दुपारनंतर आंदोलन चिघळले आणि परिस्थिती हाताबाहेर गेली. नगर रोडवरील क्षीरसागरांच्या बंगल्यासमोरील भागाला आग लावल्यानंतर आतमध्ये असलेल्यांना मोठ्या कसरत व कौशल्याने बाहेर काढण्यात आले. तर, पोलिसांनी आश्रुधुराच्याा नळकांड्या फोडल्यामुळे जमाव पांगला व पंडितांचा सुभाष रोडवरील बंगला वाचला.

अगोदर साखळी उपोषण, नंतर शासकीय कार्यालये बंद केल्यानंतर आंदोलकांनी दगडफेक सुरु केली. यानंतर शहरातील रस्त्यांवर टायर तसेच बॅनर जाळण्यात आले. रात्री नगर रोडवरील माजी मंत्री व आमदार क्षीरसागर यांच्या घराकडे जमाव गेला. हजारो लाेकांनी घोषणा देत बंगल्याच्या आवारात आग लावली. वाहनांनी पेट घेतल्याने आगीचे मोठे लोट निघत होते. यावेळी क्षीरसागरांच्या कुटूंबातील आमदार संदीप क्षीरसागर, त्यांच्या पत्नी नेहा क्षीरसागर, माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, त्यांच्या पत्नी माजी नगराध्यक्ष डॉ. दीपा क्षीरसागर, डॉ. योगेश क्षीरसागर व त्यांच्या पत्नी डॉ. सारिका क्षीरसागर यांच्यासह त्यांची चार मुले अशी मंडळी घरात होती.

Maratha Reservation : आग लावली तेव्हा क्षीरसागरांच्या बंगल्यात कोण होतं?, कुटुंबातील सदस्य 'असे' पडले बाहेर
Maratha Reservation : बीडमध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण; नेत्यांची घरे, कार्यालये पेटवली

आगीचे लोट अधिक व दारात हजारोंची गर्दी होती. त्यामुळे त्यांना बाहेर पडणे कठीण होते. याच वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष वाळके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष साबळे, शिवाजी नगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक केतन राठोड फौजफाट्यासह दाखल झाले. दरम्यानच्या काळात संदीप क्षीरसागर व त्यांच्या पत्नी त्यांच्या बंगल्याच्या बाजूला असलेल्या एका घरात छतावरुन उतरल्याचे पोलिस सुत्रांनी सांगीतले. त्यांना यासाठी मोठी कसरत करावी लागली. त्यांनी समवेत त्यांची दोन मुले व डॉ. योगेश क्षीरसागर यांची मुलेही नेली. तर, पोलिसांनी मोठ्या कसरत व कौशल्याने घरातील डॉ. भारतभूषण क्षीरसागर, डॉ. दिपा क्षीरसागर, डॉ. योगेश क्षीरसागर व डॉ. सारिका क्षीरसागर यांना पोलिस वाहनातून सुरक्षितस्थळी हलविले.

Maratha Reservation : आग लावली तेव्हा क्षीरसागरांच्या बंगल्यात कोण होतं?, कुटुंबातील सदस्य 'असे' पडले बाहेर
Maratha Reservation: मुख्यमंत्री शिंदेंना दुसरा धक्का! आणखी एका खासदाराने दिला राजीनामा

आश्रुधुराच्या नळकांड्यामुळे वाचले शिवछत्र

अगोदर सुभाष रोड व शहरात तोडफोडीनंतर रात्री आंदोलकांननी क्षीरसागरांच्या बंगल्याला आग लावली. यानंतर आंदोलकांनी पुन्हा सुभाष रोडकडे कूच केले. अण्णाभाऊ साठे चौकात असलेल्या माजी मंत्री शिवाजीराव पंडित व माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या बंगल्यावर दगडफेक सुरु केली. उशिरा ही दगडफेक सुरु होती. रात्री साडेसात वाजेच्या सुमारास पोलिसांचा फौजफाटा पोचला व आश्रुधुराच्या नळकांड्या फोडून आंदोलकांचा जमाव पांगविण्यात आला. त्यामुळे पंडितांचे शिवछत्र निवासस्थान आग लागण्यापासून वाचले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.