Maratha Reservation : अधिवेशनात निर्णयाची शक्यता कमी - उपमुख्यमंत्री अजित पवार

‘मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी बिहारच्या धर्तीवर राज्यातही आरक्षणाची मर्यादा वाढविण्याचा पर्याय राज्य सरकारपुढे आहे.
Ajit Pawar
Ajit PawarSakal
Updated on

‘मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी बिहारच्या धर्तीवर राज्यातही आरक्षणाची मर्यादा वाढविण्याचा पर्याय राज्य सरकारपुढे आहे. मात्र, या अधिवेशनात असा निर्णय होईल, असे वाटत नाही,’ असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी (ता.१२) मांडले. तसेच मध्य प्रदेश, राजस्थानच्या धर्तीवर राज्यातही काही आमदारांना तिकीट देण्याच्या पर्यायावर चर्चा सुरू असल्याचेही ते म्हणाले.

ते म्हणाले, ‘मराठा समाजाला अन्य कोणाचे आरक्षण कमी न करता आरक्षण देण्याची राज्य सरकारची भूमिका आहे. सर्वपक्षीय बैठकीतही तसाच निर्णय घेण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील हे मात्र मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मागत आहेत. बिहार सरकारने कायदा करून आरक्षणाची टक्केवारी वाढविली आहे.

तसे आपल्यालाही राज्यात दहा ते बारा टक्के आरक्षण वाढविता येऊ शकते. छगन भुजबळ यांची ओबीसीबाबतची भूमिका ही आजची नाहीतर मंडल आयोगापासूनची आहे. त्यामुळे त्यांना आपली भूमिका घेण्याचा अधिकार आहे. मनोज जरांगे पाटील यांनाही त्यांचे म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे.’

विधिमंडळात ५५ हजार ५२० कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर

उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सादर केलेल्या ५५ हजार ५२० कोटी ७७ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून पायाभूत सुविधांची निर्मिती, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाची संधी पोचविण्यात येणार आहे.

केंद्राच्या योजनांना जुळणाऱ्या अनुदानाचाही पुरवणी मागण्यांमध्ये समावेश असल्याचे अजित पवार यांनी विधान परिषदेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेच्या उत्तरात सांगितले. तसेच पुरवणी मागण्यांमुळे वाढलेली महसुली व राजकोषीय तूट वर्षअखेरीस उत्पन्नाचे स्रोत वाढवून कमी करण्यात येईल, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या होत्या.

‘तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांना बदलण्याचा आदेश काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी दिला होता. त्यांच्याऐवजी बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे पाटील तसेच हर्षवर्धन पाटील यांच्यापैकी एकाला मुख्यमंत्री करण्याची सूचना केली होती,’’ असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी केला.

माध्यमांशी अनौपचारिक संवाद साधताना पवार म्हणाले, ‘एके दिवशी शरद पवार यांनी मला व आर. आर. पाटील यांना बोलावून काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांनी मुख्यमंत्रिपदासाठी थोरात, विखे व हर्षवर्धन पाटील या तीन नेत्यांपैकी एकाला पसंती देण्याबाबत विचारणा केली होती. यावर, काँग्रेसच्या अंतर्गत बाबीत आपण न जाण्याचे सुचविल्याचे पवार यांनी सांगितले.

‘काँग्रेसकडून राज्यात सुरु असलेल्या नेतृत्वबदलाची माहिती चव्हाण यांना मिळाली असावी. त्यावेळी ते पंढरपूर येथे आषाढी यात्रेसाठी गेले होते. तेथून ते रात्री मुंबई व तेथून दिल्ली येथे गेले. त्या रात्री अडीच वाजता राहुल गांधी परदेशातून येणार होते. त्यामुळे चव्हाण हे विमानतळावर थांबून होते.

तिथे त्यांनी राहुल गांधी यांची भेट घेत चर्चा केली. दुसऱ्या दिवशी शरद पवार यांना अहमद पटेल यांचा फोन आला व नेतृत्व बदलाची प्रक्रिया थांबली,’ असे अजित पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.