Maratha Reservation: मराठा तरुणाच्या आत्महत्येवर जरांगेंची प्रतिक्रिया; सरकारला दिला अल्टिमेटम

जालन्यातील मराठा आंदोलक सुनील कावळे यांनी एक सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली आहे.
Manoj Jarange
Manoj Jarangeesakal
Updated on

जालन्यातील मराठा आंदोलक सुनील कावळे यांनी एक सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली आहे. यावर आरक्षणाचे खंदे समर्थक आणि आंदोलक मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया देताना थेट सरकारला अल्टिमेटम दिला आहे. सरकारनं आता हे बलिदान वायाला जाऊ देऊ नये, तातडीनं आरक्षण द्यावं, अशी मागणी त्यांनी केली आहे. (Maratha Reservation youth suicide Manoj Jarange comment on it gives ultimatum to govt)

Manoj Jarange
Prithviraj Chavan: "बोरवणकरांचा गैरसमज झाला असावा"; आधीच्या विधानावरुन पृथ्वीराज चव्हाणांचा यूटर्न

सरकारनं बळी घ्यायचं ठरवलंय

माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना जरांगे म्हणाले, "सरकारनं मराठा आंदोलकांचे बळी घ्यायचं का ठरवलंय कळत नाही. सरकारमुळेच आमचे बळी पडायला लागलेत, मराठा समाजाला मी हातपाय जोडून आवाहन करतो की आपल्याला आरक्षण मिळणार आहे, आपण घेतल्याशिवाय सोडणार नाही" (Latest Marathi News)

Manoj Jarange
Lalit Patil Drugs Case: ललित पाटीलवर होणार मोक्का अतंर्गत कारवाई? पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर

मराठा तरुणांना आवाहन

आपण खूप वर्षे दम धरला आहे, थोडे दिवस आणखी दम धरा. जर मुलंच कमी व्हायला लागले तर आरक्षण घेऊन उपयोग काय? हे सर्व पाप सरकारचं आहे. सरकारला किती मुडदे पाडायचे आहेत. सरकारनं आता तरी त्या भावांचं बलिदान वाया जाऊ देऊ नये. (Latest Marathi News)

तातडीनं मराठा आरक्षणाचा निर्णय सरकारनं आता घ्यावा. २४ तारखेनंतर होणारं शांततेचं आंदोलन सरकारला परवडणार नाही. आम्ही हे बलिदान वाया जाऊ देणार नाही, असंही पुढे जरांगे यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.