Maratha Reservation : राज्यातील ४८ खासदारांनी राजीनामे द्यावेत; उद्धव ठाकरे यांचे आवाहन

‘मातोश्री ’येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
uddhav thakre
uddhav thakre sakal;
Updated on

मुंबई - ‘‘राज्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळात असलेल्या महाराष्ट्रातील मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत. त्याचाही परिणाम पंतप्रधानांवर होणार नसेल तर महाराष्ट्रातील ४८ खासदारांनी एकजुटीने राजीनामा देऊन महाराष्ट्राची ताकद दाखवा,’’ असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

‘मातोश्री ’येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीवेळी तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री चिंतामणराव देशमुखांनी दाखवलेल्या स्वाभिमानी बाण्याची आठवण यावेळी उद्धव ठाकरे यांनी जागवली. ते म्हणाले, की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीवेळी मुंबईत मोरारजी सरकारच्या आदेशाने झालेल्या गोळीबाराच्या चौकशीस तत्कालीन पंतप्रधान नेहरूंनी नकार दिला होता. तेव्हा देशमुखांनी राजीनामा दिला होता. तसेच आता महाराष्ट्रातील मंत्र्यांनी महाराष्ट्रातील अस्वस्थतेबद्दल पंतप्रधानांना सांगायला हवे की महाराष्ट्र पेटतोय, जातीपातींमध्ये भिंती उभ्या राहताहेत.

सर्वसमावेशक असे आरक्षण तुम्ही देणार आहात की नाही, जर देणार नसाल तर आम्ही तुमच्या मंत्रिमंडळात राहू शकत नाही. हा घ्या आमचा राजीनामा, असे केले तरच हा प्रश्न पुढे सोडविला जाईल. मराठा, ओबीसी, धनगर समाज यांना समाधानी करणारे आरक्षण लोकसभेत दिले पाहिजे. मंत्रिमंडळाने राजीनामा दिल्यानंतरसुद्धा जर पंतप्रधानांवर काही परिणाम होणार नसेल तर महाराष्ट्रातील ४८ खासदारांनी राजीनामा द्यावा. महाराष्ट्र कसा एकवटतो ते दाखवायची आणि हुकूमशाही मोडून टाकण्याची वेळ आता आलेली असल्याचे आवाहन महाराष्ट्रातील सर्व खासदारांना केले.

uddhav thakre
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी शिर्डीत कडकडीत बंद

सरत्या वर्षासह सरकारलाही निरोप

३१ डिसेंबर रोजी सरत्या वर्षाबरोबरच राज्य सरकारला देखील निरोप देणार असल्याचा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करता यापुढेही लवाद आपल्या मस्तीत वागत राहिला तर जे हाल होतील ते कुणालाही सावरता येणार नाहीत, अशी भीतीही ठाकरे यांनी व्यक्त केली. त्यांनी यावेळी अपात्र आमदार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश थेट वाचून दाखवला

uddhav thakre
Maratha Reservation : घनसावंगी पंचायत समितीच्या कार्यालयास आग; कागदपत्रे जळून खाक, अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल

सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रतेसंदर्भात मुदत घेण्यासाठी ३१ डिसेंबरची मुदत दिली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे म्हणाले की, जगातील सर्वात मोठी लोकशाही धोक्यात आली आहे. लवाद सर्वोच्च न्यायालयाचा हा आदेश मानणार आहे की नाही? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर असे म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाचा आदेश मी अद्याप वाचलेला नाही. त्यांच्यासाठी आणि राज्यातील सर्व जनतेला सर्वोच्च न्यायालयाचे आदेश काय आहेत हे कळले पाहिजे. मी आमच्या सर्व आमदारांना सांगणार आहे की, जर नार्वेकर मुंबईत असतील त्यांना या आदेशाची प्रत नेऊन द्या आणि त्यांच्यासमोर याचे वाचन करा, अशा सूचनाही ठाकरे यांनी ठाकरे गटाच्या आमदारांना केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.