Prajakta Mali : प्राजक्ताचं ठरलं! विदर्भात लागणार पहिलं प्रदर्शन

Prajakta mali
Prajakta maliesakal
Updated on

मुंबईः मराठी अभिनेत्रींमध्ये सध्या प्राजक्ता माळीचा बोलबाला आहे. राज्यात तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. विशेषतः तिच्या रानबाजार वेब सीरिजमुळे ती पुन्हा उजेडात आली.

प्राजक्ता माळी हिने नुकताच एक ब्रँड लाँच केला आहे. 'प्राजक्तराज' नावाने तिने इमिटेशन ज्वेलरीचं उत्पादन सुरु केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या हस्ते 'प्राजक्तराज'चं उद्घाटन झालं.

'प्राजक्तराज' हा केवळ इमिटेनश ज्वेलरीचा ब्रँड नाही तर मराठी पारंपारिक दागिन्यांचं दालन ठरणार आहे. त्यासाठी प्राजक्ता अनेक इतिहास अभ्यासकांशी भेटीगाठी घेत आहे. काळाच्या उदरात लुप्त झालेले कित्येक दागिने तिने पुन्हा समोर आणले आहेत.

हेही वाचाः सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

आपले मराठी दागिने आपण टिकवले आणि रुजवले पाहिजेत, असा प्राजक्ताचा हट्ट आहे. त्यासाठी तिने कित्येक पट्टीचे कारागिर सोबत घेतले आहेत. त्यामुळे प्रति सोनं असलेल्या इमिटेशन ज्वेलरीच्या माध्यमातून प्राजक्ता स्वस्तात दागिने लाँच करीत आहे.

सध्या प्राजक्ताच्या 'प्राजक्तराज' ब्रँडचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय. अनेक मान्यवरांनी तिच्या या आगळ्या व्यवसायाचं कौतुक केलंय. आज प्राजक्ताने फेसबुक पोस्ट करुन 'प्राजक्तराज'चं पहिलं प्रदर्शन विदर्भार लागणार असल्याचं जाहीर केलं.

Prajakta mali
एका म्हशीने अख्ख्या गावाला रडवलं; 32 व्या वाढदिवसाची जय्यत तयारी सुरु होती, पण...

प्राजक्तानं तिच्या पोस्टमध्ये फोटो शेअर करत लिहिलयं, “ब्रम्हपुरी महोत्सव…“प्राजक्तराज” विषयी महोत्सवाइतकं बोललं गेलं की मी भारावून गेले. खूप आभार. ठरवून टाकलं…‘प्राजक्तराज’चं पहिलं प्रदर्शन विदर्भात लागणार… “भद्रावती” "

प्राजक्तानं ब्रह्मपुरी महोत्सावाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थिती लावली. या महोत्सवातील काही खास फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले. विषेश म्हणजे तिच्या या फोटोत तिच्यासोबत बॉलिवूड अभिनेता सोनू सूदही आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.