Marathi Bhasha Gaurav Din : आज २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरवदिन आहे. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्म दिवसानिमित्त हा दिवस साजरा केला जातो. मराठीविषयी जनजागृती पसरावी आणि मराठी भाषा घरोघरी पोहचावी या उद्देशाने मराठी भाषा गौरवदिन साजरा केला जातो.
कुसुमाग्रजांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. कुसुमाग्रजांनी मराठी कवितेला नव्या उंचीवर नेऊन ठेवले. सध्या मराठी भाषेचे जतन करणे, हे खूप मोठे आव्हान आहे. आज आपण एका अशा व्यक्ती विषयी जाणून घेणार आहोत ज्यांनी मराठी भाषेला जपण्याचा आणि मराठी भाषा जनमानसात पोहचवण्याचा नेहमीच प्रयत्न केला. ते म्हणजे राज ठाकरे.
मराठी भाषा, मराठी भाषेची अस्मिता, मराठी भाषेचे जतन यासाठी नेहमी राज ठाकरे अग्रेसर होते. मराठी भाषेला जपण्याची सुरवात ही स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. मराठी भाषेबद्लचा त्यांचा लढा आता राज ठाकरे पुढे नेत आहे.
राज ठाकरे यांनी वेळोवेळी मराठी भाषेविषयी त्यांच्या मनात असलेले प्रेम दाखवून दिले. एवढंच काय तर प्रत्येक मराठी माणसाला मराठी आली पाहिजे, असा अट्टहास त्यांनी धरला. मराठी भाषा जपण्यासाठी, मराठी भाषेला ‘अभिजात भाषेचा’ दर्जा मिळण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले.
व्यवहारात मराठी, प्रशासनात मराठी, दूरसंचार माध्यमांमध्ये मराठी, दूरदर्शनच्या समालोचनात मराठी असायलाच हवी, असं त्यांचं ठाम मत होतं त्यासाठी त्यांनी अनेकदा ठोस पावले उचलली. मराठी जगाची ज्ञानभाषा व्हावी आणि जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडावा हे आपलं स्वप्न आहे, असं राज ठाकरे यांनी कित्येकदा बोलून दाखवलं.
सर्व दुकानं, आस्थापने आणि कार्यालयांवरील नामफलक अर्थात पाट्या या मराठीत असाव्यात, असा त्यांचा नेहमी आग्रह होता त्यानुसार उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हा नियम लागूही करण्यात आला होता.
मनसे या त्यांच्या पक्षाद्वारे मराठीपणाचा मुद्दा हाच त्यांचा अजेंडा होता. याच पार्श्वभूमीवर 2008 मध्ये मनसेने उत्तर भारतीयांविरोधात आंदोलन छेडलं होतं. त्याच वर्षी रेल्वे भरतीच्या आधी बिहारहून आलेल्या उमेदवारांना मनसेच्या सैनिकांनी मारहाण केली होती.
दुसऱ्या राज्यातील मुलं नोकरीच्या शोधात मुंबईत येऊन महाराष्ट्रातील मुलाच्या तोंडातला घास हिसकावून घेतात आणि यामुळेच मराठी माणूस मागे पडतो, असं मत राज ठाकरे यांचं होतं
मराठी भाषा, मराठी भाषेची अस्मिता जपली पाहिजे आणि मराठी माणूस आणि मराठी माणसाला त्याचे सर्व हक्क मिळायला पाहिजे, यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.