भाजप नेत्यांच्या धमक्यांना भुजबळ आणि मी घाबरत नाही !
जळगाव : भाजपने (Bjp) सुरवातीपासूनच ओबीसी (OBC lieder) नेत्यांना न्याय दिला आहे. मात्र, गेल्या पाच-सहा वर्षांच्या काळात ओबीसी नेत्यांना त्रास देण्याचा प्रकार सुरु झाला. पक्षातील अनेकांना काही व्यक्तींनी छळले.. माझ्यावरील आरोप, चौकशी आणि आता ‘ईडी’ (ED) चौकशी ही त्यांचेच षडयंत्र असल्याचा आरोप माजी मंत्री एकनाथराव खडसेंनी (Eknathrao Khadse) केला.
( bjp leaders ed threats eknathrao khadses unequivocal answer)
छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) जामिनावर बाहेर असल्याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil) यांनी केलेल्या वक्तव्याबाबत खडसेंना विचारले असता ते बोलत होते. भाजपने सुरवातीपासून ओबीसींना न्याय दिला. मात्र, पक्षातील काही व्यक्तींनी अलीकडच्या काळात आमच्यासारख्या नेत्यांवर अन्याय केला. माझ्यावरील आरोप, चौकशीबाबत मी विधिमंडळात अखेरपर्यंत उत्तर मागितले, मात्र ते मिळाले नाही. ‘ईडी’ (ED)व सीबीआयसारख्या (CBI) संस्थांच्या माध्यमातून त्रास दिला जात आहे. परंतु, अशा चौकशांना भुजबळ अथवा मीदेखील घाबरत नाही, असे खडसे म्हणाले.
गडकरींशी सहमत
सध्या राज्याचीच नव्हे तर देशातील कोरोनाची स्थिती गंभीर आहे. त्यामुळे अशावेळी राजकारण करणे योग्य नाही, असे खुद्द नितीन गडकरींनी (Minister Nitin Gadkari) सांगितले. त्यांच्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. कोरोना पूर्णपणे हद्दपार करेपर्यंत प्रत्येकाने आपले योगदान दिले पाहिजे, असे मत आपण महिनाभरापूर्वीच मांडल्याचे खडसेंनी सांगितले.
‘वॉटरग्रेस’प्रकरणी चौकशीची मागणी
जळगाव महापालिकेने स्वच्छतेचा ठेका वॉटरग्रेस कंपनीला दिला असून या ठेक्याबद्दल नागरिक व नगरसेवकांच्याही तक्रारी आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचा आरोप होत आहे. ॲड. विजय पाटील यांनी यासंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती दिली असून या ठेक्यात काही चुकीचे झाले असेल तर त्याची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई झालीच पाहिजे. त्यासाठी आपण स्वत: सरकारकडे हा विषय मांडून चौकशीची मागणी करु, असे खडसे म्हणाले.
( bjp leaders ed threats eknathrao khadses unequivocal answer)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.