Viral Video: पाण्याचा अंदाज चुकला अन् पुलावरचा ट्रॅक्टर थेट नदीत; चालकाला कसंबसं वाचवलं, व्हिडीओ पाहा

Marathwada Rain : लातूर जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. जळकोट तालुक्यातील तीरू नदीच्या पुलावरून पाणी गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर पुलावरून जातांना ट्रॅक्टर चालवण्याचा अंदाज चुकल्याने ट्रॅक्टर नदीत उतरलं. दरम्यान यावेळी जमावाने ट्रॅक्टर चालकाचा जीव वाचवला आहे. लातूर जिल्ह्यातील तिरू नदीच्या पुलावरचा हा व्हिडीओ व्हायरल होतोय.
Viral Video
Viral Videoesakal
Updated on

Maharashtra Rain Updates : राज्यामध्ये मागच्या दोन दिवसांसापून तुफान पाऊस सुरु आहे. अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर धरणंदेखील पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत. मागच्या २४ तासांमध्ये राज्यात पाच जणांचा पावसामुळे मृत्यू झालाय.

लातूरमधला एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक ट्रॅक्टरचालक पुलावरुन ट्रॅक्टर चालवत पुढे नेतो. परंतु त्याचा अंदाज चुकल्याने ट्रॅक्टर नदीपात्रात जातं. सुदैवाने या घटनेत ट्रॅक्टर चालकाचा जीव वाचला आहे.

लातूर जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. जळकोट तालुक्यातील तीरू नदीच्या पुलावरून पाणी गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर पुलावरून जातांना ट्रॅक्टर चालवण्याचा अंदाज चुकल्याने ट्रॅक्टर नदीत उतरलं. दरम्यान यावेळी जमावाने ट्रॅक्टर चालकाचा जीव वाचवला आहे. लातूर जिल्ह्यातील तिरू नदीच्या पुलावरचा हा व्हिडीओ व्हायरल होतोय.

Viral Video
Paris Olympic 2024 : महाराष्ट्राच्या सुपूत्राच्या योगदानामुळे भारताची मान उंचावली, तिरंदाजांनी पदकाच्या दिशेने झेप घेतली

दरम्यान, विदर्भातील काही जिल्ह्यांत दोन दिवस पावसाची रिपरिप सुरू होती. या रिपरिपनंतर गुरुवारी पावसाने विश्रांती घेतली. मात्र विदर्भात सर्वदूर सकाळपासून ढगाळ वातावरण होते. मराठवाड्यात अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. गुरुवारी (ता.२५) सकाळपर्यंत म्हणजे गेल्या चोवीस तासात मराठवाड्यात १९.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. लातूर शहर व जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरूच आहे. बीड जिल्ह्यातील धनेगाव येथील मांजरा धरणातही पाण्याची आवक सुरू आहे.

दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातही तुफान कोसळणाऱ्या पावसामुळे राधानगरी धरणाचे पाच दरवाजे उघडावे लागले आहेत. यामुळे पंचगंगा नदीची पातळी झपाट्याने वाढत असून मोठा पूर येण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. जिल्ह्यातील ८० हून अधिक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. अलमट्टी धरणातूनही विसर्ग सुरू झाला आहे. साताऱ्यात पावसाचा जोर कायम असल्याने कोयना आणि कण्हेर या धरणांमधून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. यामुळे कृष्णा नदीच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने कऱ्हाड, पाटण आणि सांगली जिल्ह्यात सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे.जिल्ह्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com