Maternity Leave: जेष्ठ महिलांना मोफत बस सेवा, खासगी क्षेत्रात मातृत्व रजा? काय असणार चौथ्या महिला धोरणात

Maternity Leave: निमशासकीय व खासगी क्षेत्रात नोकरी करणार्‍या महिलांसाठी मातृत्व रजेची तरतूद करण्यात आलेली आहे.
Maternity Leave
Maternity LeaveEsakal
Updated on

राज्यातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी काही निर्णय घेत धोरण तयार केले आहे. या धोरणात निमशासकीय व खासगी क्षेत्रात नोकरी करणार्‍या महिलांसाठी मातृत्व रजेची तरतूद करण्यात आलेली आहे. (Latest Marathi News)

मातृत्व रजेसोबतच पितृत्व रजेसाठीही प्रयत्न करण्यात येणार आहेत. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हे धोरण पाठवण्यात आलं असून त्यांच्या मान्यतेनंतर या आठवड्यात होणार्‍या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे धोरण मंजूर होण्याची शक्यता वर्तवण्यात आले आहे.

Maternity Leave
Ajit Pawar : राज्यसभा निवडणुकीनंतर भूकंप? अजित पवार गट अलर्ट मोडवर; आमदारांना दिल्या 'या' सूचना

गेल्या तीन धोरणांपेक्षा हे चौथे धोरण वेगळे असणार आहे. त्यामध्ये महिलांचे आरोग्य, पोषण, आहार, शिक्षण व कौशल्य विकासावर या धोरणात भर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ महिलांना एसटीतून मोफत प्रवासाची सवलत दिली जाणार आहे. (Marathi Tajya Batmya)

त्याचबरोबर महिला हिंसाचार रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जाणार आहेत. लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारण्याच्या सूचना राज्य शासनाचे संबधित विभाग आणि खासगी रस्ते बांधणार्‍या कंपन्यांना देण्यात येणार आहेत.

Maternity Leave
Rajyasabha Election: राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला किती जागा मिळणार?

शासनाच्या पाळणाघर योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी, महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांचा आळा बसावा यासाठी जलदगती न्यायालये स्थापन केली जाणार आहेत. या धोरणाच्या अंमलबजावणीची प्रगती तपासण्यासाठी खास समिती स्थापन केली जाणार असून ही समिती शासनाला दर सहा महिन्यांनी अहवाल सादर करणार आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.