Santosh Bangar: "बांगरांना मंत्रिपद दिल्यास मटक्याला अधिकृत मान्यता मिळेल"; दानवेंचा खोचक टोला

हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांच्या संभाव्य मंत्रिपदावरुन वाद पेटण्याची शक्यता आहे.
Ambadas Danve_Santosh Bangar
Ambadas Danve_Santosh Bangar
Updated on

मुंबई : शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांना येत्या मंत्रिमंडळाच्या विस्तारत मंत्रीपदाची शंभर टक्के संधी मिळेल असं स्वतः बांगर यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानावर विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी खोचक टोला लगावला आहे. संतोष बांगर यांना मंत्रिपद मिळाल्यास मटक्याला अधिकृत मान्यता मिळेल असं दानवे यांनी म्हटलं आहे. (Matka gets official recognition if Santosh Bangar gets ministerial post says Ambadas Danave)

Ambadas Danve_Santosh Bangar
Delhi Govt: केंद्राच्या अध्यादेशाविरोधात दिल्ली सरकारची सुप्रीम कोर्टात धाव; काँग्रेसच्या भूमिकेमुळं संभ्रम

बांगर यांनी एका सभेला संबोधित करताना म्हटलं की, "यावेळेस मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, त्यावेळी हा शिवसेनेचा आमदार शंभर टक्के मंत्रिपदाची शपथ घेणार. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं आहे की, आम्हाला मराठवाड्यातील नेता शंभर टक्के मंत्रिमंडळात घ्यायचा आहे"

Ambadas Danve_Santosh Bangar
Tomato Price Rise: देशभरात टोमॅटोचे भाव गगनाला का भिडलेत? ग्राहक व्यवहार सचिवांनी सांगितलं कारण

तर बांगर यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना अंबादास दानवे म्हणाले, "जर बांगर यांना मंत्रिपद मिळालं तर या महाराष्ट्रात मटक्याला राजकीय मान्यता मिळेल. महाराष्ट्र सरकारची अधिकृत मान्यता मिळेल. याचीच वाट महाराष्ट्र पाहतोय की काय हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बघावं"

Ambadas Danve_Santosh Bangar
Pune Girl Student Attack: 'त्या' सुपरहिरोंचा शरद पवारांच्या हस्ते होणार 'बालगंधर्व'मध्ये जाहीर सत्कार

दरम्यान, बांगर यांच्या मंत्रिपदाच्या चर्चेवरुन राज्यात वाट पेटण्याची शक्यता आहे. दानवे आणि बांगर शिवसेनेचे दोन आमदार एक शिंदे तर दुसरा ठाकरे गटाचा. पण आता दोघांनीही वेगळ्या वाटा स्विकारल्यानं त्यांच्यामध्ये यावरुन वाद होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.