राऊतांनी मेधा सोमय्या यांनी टॉयलेट घोटाळ्यात भ्रष्टाचार केल्याचा दावा केला आहे.
मागील अनके दिवसांपासून राज्यात अनेक घडामोडींचा वेग वाढला आहे. एकनाथ शिंदे सरकारने महाविकास आघाडीच्या निर्णयांना स्थगिती देण्याचा सपाटा लावला आहे. यामुळे आता शिवसेना आणि शिंदे गटातील वाद शिगेला पोहोचला आहे. दरम्यान, या सगळ्यात आता एक वेगळी राजकीय बातमी समोर येत आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप यांच्यातील वाद वाढण्याची शक्यता आहे.
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या (Medha Somaiya) यांनी शिवसेना (Shiv Sena) नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या विरुध्द मानहानीचा खटला दाखल केला होता. दरम्यान, माझगाव दंडाधिकारी न्यायालयाने (District Court) याप्रकरणी संजय राऊत यांना समन्स बजावला आहे. राऊतांना ६ ऑगस्ट रोजी हजर राहण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत.
राऊतांना समन्स बजावण्यात आल्यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा किरीट सोमय्या विरुध्द राऊत असा 'कलगीतुरा' लवकरच पाहायला मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगणार आहे. सोमय्यांनी यापूर्वी शिवसेना, उद्धव ठाकरे, प्रताप सरनाईक, भावना गवळी, अर्जुन खोतकर यांच्याविरोधात गंभीर आरोप केले आहेत. शिवसेना विरुद्ध सोमय्या या वाद महाराष्ट्राला नवा नाही. आता राऊत या समन्सला काय उत्तर देतात हे लवकरच कळेल.
काय आहे नेमकं प्रकरण ?
राऊतांनी मेधा सोमय्या यांनी टॉयलेट घोटाळ्यात भ्रष्टाचार केल्याचा दावा केला आहे. मीरा भाईंदरमध्ये 154 सार्वजनिक शौचालये बांधण्यात आले होते. 16 शौचालय बांधण्याचे कंत्राट मेधा सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानला देण्यात आले होते. संबंधीत बांधकामात बनावट कागदपत्रे सादर करून अधिकाऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. मेधा सोमय्यांनी बनावट कागदपत्राद्वारे खोटी बिले काढून पैसे उकळलेत असा गंभीर आरोप राऊतांनी केला आहे. आरोपांविरुध्द मेधा सोमय्या यांनी राऊतांच्याविरोधात मानहानीचा दावा केला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.