MBBS : एमबीबीएसचे ऑफलाईन प्रवेश होणार रद्द! खासगी वैद्यकीय महाविद्यालयांचा प्रताप

MBBS Student
MBBS Studentsakal
Updated on

लातूरः देशभरातील वैद्यकीय अभ्यासक्रमाचे प्रवेश हे ऑनलाईन घ्यावेत, असा आदेश असताना राज्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी राज्य सरकारच्या आदेशानुसार प्रवेशाची पाचवी फेरी महाविद्यालयीन स्तरावर घेऊन प्रवेश प्रक्रिया पार पाडली.

याची गंभीर दखल राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने घेतली आहे. ऑफलाइन केलेले हे प्रवेश रद्द करण्याचे निर्देश आयोगाने बुधवारी (ता. १८) राज्याचा सीईटी कक्ष व सर्व खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना दिले आहेत.

MBBS Student
Telangana Election : ''केसीआर यांची चौकशी का होत नाही?'', राहुल गांधींनी उपस्थित केला कळीचा मुद्दा

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या आदेशामुळे ऑफलाइन प्रवेश घेतलेल्या सुमारे १४१ विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी आहे. खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या पहिल्या चार फेऱ्या ऑनलाइन झाल्या आहेत.

पाचव्या फेरीच्या वेळी अचानक वेळापत्रक बदलून ही प्रवेश प्रक्रिया महाविद्यालयीन स्तरावर घेण्याच्या सूचना सीईटी कक्षाने केली होती. यात कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश दिल्याची चर्चा होती. या प्रक्रियेत राज्यात सुमारे १४१ प्रवेश झाल्याचा अंदाज आहे. यात मुंबई विभागातील बहुतांश जागांचा समावेश आहे.

MBBS Student
Weather Update: भारतातून मान्सून चार दिवस उशिराने माघारी; यंदा किती झाला पाऊस?

डॉक्टर होण्याचं स्वप्न उराशी बाळगून अनेक विद्यार्थी रात्रीचा दिवस करतात. परंतु खासगी वैद्यकीय महाविद्यालयं अनेकदा मनमानी करताना दिसून येतात. राज्यातील खासगी महाविद्यालयांनी पाचवी फेरी ऑफलाइन घेतल्याने अनेकांवर अन्याय झाला होता. अखेर पाचव्या फेरीतील प्रवेश रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.