हॉटेलमधील जेवण 30 टक्क्यांनी महागणार!

या सर्व दरवाढीचा फटका आता राज्यातील खवय्यांना बसणार आहे.
meals in hotels
meals in hotelsesakal
Updated on
Summary

या सर्व दरवाढीचा फटका आता राज्यातील खवय्यांना बसणार आहे.

दिवाळीतील फराळ खाऊन-खाऊन बोर झाला आहात. चला मग बाहेर जेवायला जाऊ. बेत चांगला आहे. पण पाकिटात रक्कम जरा जास्तच घ्या. हॉटेलींगही आजकाल महाग झालं. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने सर्वच महागलं. मजुरीही महागली. हॉटेलवाल्यांनी म्हणे सर्वच खाद्य पदार्थांची दरवाढ करण्याचा निर्णय घेतला. या सर्व दरवाढीचा फटका आता राज्यातील खवय्यांना बसणार आहे.

राज्यातील रेस्टारंटमधील सर्व खाद्य पदार्थांचे दर तब्बल 30 टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय महाराष्ट्रातील रेस्टारंट मालक संघटनेच्या विचाराधीन असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे रेस्टांरंटमध्ये जाऊन चमचमीत खादपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी अधिकचे पैसे ग्राहकांना मोजावे लागू शकतात.

meals in hotels
पुन्हा दरवाढ! जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे आजचे दर

इंधन दरवाढीमुळे हॉटेल व्यवसायापुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. आधी कोरोना संकट काळात दीड-पावणे दोन वर्षे हॉटेल व्यवसाय ठप्प होता. त्यानंतर आता इंधन दरवाढीमुळे सर्वंच वस्तूंचे दर वाढल्याने हॉटेलमधील खाद्य पदार्थांचे दर वाढविण्याशिवाय दुसरा पर्यायच शिल्लक नाही. त्यामुळे हॉटेल व्यावसायांची राज्य संघटना असलेल्या ‘आहार’ने ३० टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. अकोला जिल्ह्यातही सर्व हॉटेल व्यावसायिकांनी या महिन्यापासून खाद्य पदार्थांच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने आता बाहेर जेवन करणे महागात पडणार आहे.

दरवाढ अपरिहार्य!

पेट्रोल व डिझेलचे दर वाढल्याने सर्वच वस्तूंचे दर वाढले आहे. व्यावसायिक सिलिंडरचा दर दोन हजार २३ रुपये झाला आहे. हॉटेलमध्ये सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या सोयाबीन आणि सूर्यफुलाचे दर १४० ते १५० रुपये झाले आहेत. तूर डाळीचे दरही किलोला १०० च्या पार केले आहेत. इतर डाळीही महागल्या आहेत. कांदा ५० ते ६० रुपये किलो विकल्या जात आहे. इतर सर्वच वस्तूंचे दर वाढल्याने हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांचे वेतन वाढ करणेही आवश्यक झाले आहे. त्यामुळे हॉटेलमधील खाद्यपदार्थांचे दर वाढवणे अपरिहार्य झाले आहे.

meals in hotels
वाढती इंधन दरवाढ, त्यात डिझेल चोरी वाढली अन्

हॉटेल व्यवसाय दीड-दोन वर्षांपासून कोरोना संकटात आर्थिक संकटाचा सामना करीत आहे. त्यातच इंधन दरवाढ व इतर वस्तूंच्या दरासोबत मजुरीतही वाढ झाल्याने खाद्यपदार्थांचे दर वाढविण्याशिवाय पर्याय शिल्लक नाही. अकोला शहर व जिल्ह्यातील स्पर्धा लक्षात घेवून २५ ते ३० टक्के दरवाढीचा प्रस्ताव आहे.

- योगेश अग्रवाल, जिल्हाध्यक्ष, सर्व खाद्यपेय विक्रेता असोसिएशन, अकोला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.