सोलापूर : युद्ध म्हणजे दुर्देवाने आता राजकारणाचा भाग झाला आहे, असे मत नर्मदा बचाओ आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केले. देशातील खासगी रुग्णालयांचे राष्ट्रीयकरण झाले पाहिजे. त्यामुळे नागरिकांना चांगले व अल्पदरात उपचार मिळतील, असेही त्या म्हणाल्या.
जनआंदोलनानिमित्त काढण्यात आलेल्या राज्यस्तरीय दौऱ्यांतर्गत आज बुधवारी त्या सोलापुरात आल्या होत्या. सोलापूर श्रमिक पत्रकार संघात झालेल्या वार्तालापाप्रसंगी त्यांनी हे मत व्यक्त केले. त्या म्हणाल्या""एकीकडे चायनाचे पंतप्रधान येतात आणि साबरमती आश्रमात झुले झुलतात. चीनच्या वस्तुंवर आपण बहिष्कार टाकतो पण त्यांच्यासोबत झालेले करार तसेच सुरु ठेवतो. तिसरीकडे त्यांच्या सीमेवर युद्धाची तयारी करून राष्ट्रभक्ती दाखविण्याचा प्रयत्न करतो. हे सर्व परस्पर विरोधी आहे. दोस्त राष्ट्रांबरोबर राजकीय, भौगोलिक मुद्यांवर जरूर चर्चा व्हावी. निगोशिएशन्स व्हावेत, संबंध सुरक्षित राखले जावेत. युद्धामुळे आपले जवानही शहीद होणार नाहीत, आणि देशही भोगणार नाही.``
आर्थिक व्यवहाराचे नियोजन करताना आत्मनिर्भर भारत घोषणेची सुरुवात गावनिर्भर भारत इथंपासून सुरुवात केली पाहिजे. आत्मनिर्भरतेसाठी आयात-निर्यातीचे धोरण बदलावेच लागले. आजच्या घडीला आपण तेलबिया सुद्धा 85 टक्के आयात करतो. हे आत्मनिर्भर देशाचे चित्र नाही. इतकेच नव्हे तर जीडीपी वाढविण्यासाठी विदेशी गुंतवणूकदारांचीच वाट पहात आहेत. येथील खरी गुंतवणूक ही निसर्ग आणि श्रमाची आहे. त्याची किंमत वाढविण्यासाठी प्रयत्न करा. स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण करणारे उद्योग उभारले पाहिजेत, असेही पाटकर म्हणाल्या.
देशातील सद्यस्थिती पाहता सर्वाधिक बळी हे कोरोनामुळे जातील की कुपोषणाने याबाबत संदिग्धता आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिले आहेत, त्याचे निश्चितच स्वागत आहे. एकीकडे महाराष्ट्राचे सरकार श्रम कायद्याची अंमलबजावणी करीत असताना मोदी सरकार मात्र हा कायदा संपविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचा आम्ही विरोध करतो. 17 मे पर्यंतचे वेतन मिळाले पाहिजे यासाठी महाराष्ट्र सरकारने हस्तक्षेप करायला हवा, असेही पाटकर म्हणाल्या.
देशातील प्रातिनिधीक चित्र सोलापुरात
लॉकडाऊनमुळे देशात जे चित्र आहे, ते सोलापुरात दिसले. धान्य दुकानदारांनी ऑनलाईनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अफरातफर केली आहे. त्यामुळे प्रत्येक श्रमिकाच्या खात्यावर दरमहा दहा हजार रुपये जमा करावेत. क्वारंटाईनच्या नावाखाली लोकांची परिक्षा घेतली जात आहे. शरीराचे तपासणीच केली जात नाही. खासगी रुग्णालयांचे राष्ट्रीयकरण झाले तर देशातल्या गरीबातल्या गरीब नागरिकांना योग्य व वेळेवर उपचार मिळतील, असेही मेधा पाटकर म्हणाल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.