Medical Admission: वैद्यकीय प्रवेश झाला कठीण! डॉक्टर होण्यासाठी आता 'नीट टू नेक्स्ट' परीक्षा

Medical Admission
Medical AdmissionESAKAL
Updated on

नागपूर: येत्या काळात डॉक्टर होण्यासाठी किती परीक्षा द्यायच्या, असा प्रश्‍न विद्यार्थ्यांपुढे उभा राहणार आहे. नॅशनल मेडिकल कमिशन (एनएमसी) पुढच्या वर्षापासून देशात पदवीधर वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी ‘नेक्स्ट’ (नॅशनल एक्झिट टेस्ट) लागू करणार आहे. आता विद्यार्थ्यांना ‘नीट पासून तर नेक्स्ट’ परीक्षा पास करावी लागणार आहे.

नेक्स्ट परीक्षेसंदर्भात मंगळवारी (ता.२७) मेडिकलमध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापकांसाठी एका माहिती सत्र पार पडले. वैद्यकीय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना बारावीनंतर ‘नीट’ (नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट) उत्तम गुणांसह पास करावी लागते.

Medical Admission
Karnataka Congress: लोकसभा निवडणुकीपूर्वी ॲक्सीटेंड होऊन काँग्रेस सरकार कोसळणार; भाजप नेत्याचा दावा

या आधारेच त्यांचा प्रवेश मिळतो. मात्र पुढील वर्षीपासून नॅशनल मेडिकल कमिशनने ‘नेक्स्ट’ लागू करण्यासंदर्भातील धोरण तयार करीत याचे प्रारूप तयार केले. यासाठी माहिती सत्राचे आयोजन करण्यात आले. लवकरच यासंदर्भात दिल्ली एम्सच्या माध्यमातून सर्व वैद्यकीय महाविद्यालयांसाठी ‘मॉक टेस्ट’ घेतली जाणार आहे.

इंटरशिपनंतर दोन टप्प्यात होणार ‘नेक्स्ट’

एमबीबीएस पदवीला असणाऱ्या अंतिम वर्षांत दरवर्षी ‘नेक्स्ट’ परीक्षा दोन टप्प्यात घेणार आहे. एमबीबीएसच्या पहिल्या भागात ‘नेक्स्ट-१’ मध्ये थेअरी असणार आहे. तर इंटरशिपनंतर नेक्स्ट-२ मध्ये प्रॅक्टिकल घेण्यात येतील.

दरवर्षी ‘नेक्स्ट १ ’ ही दरवर्षी मे व नोव्हेंबरमध्ये तर ‘नेक्स्ट २’ ही जून व डिसेंबरमध्ये घेतली जाईल. विशेष असे की, भारतीय आणि परदेशातून वैद्यकीय पदवी देणाऱ्यांसाठी ही परीक्षा असणार आहे.

Medical Admission
Nagpur: दुर्दैवी! नागपुरात महिन्याला ४६ गर्भवती मृत बाळासह येतात प्रसूतीसाठी; वर्षभरातील धक्कादायक आकडेवारी समोर

नेक्स्टच्या गुणांवर पीजी आणि सरकारी नोकरी

नेक्स्ट परीक्षा लागू केल्यानंतर एमडी प्रवेशासाठी ‘नीट’ पीजी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार नाही. नेक्स्टमधील गुणवत्तेच्या आधारे एमडी (पीजी) सीट मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. पीजीसाठी स्वतंत्र परीक्षा आता होणार नाही.

याशिवाय नेक्स्ट उत्तीर्ण केल्यानंतरच विद्यार्थ्यांची आरएमसी किंवा एनएमसीमध्ये नोंदणी केली जाईल. तसेच एफएमजीचे विद्यार्थीही यानंतर तात्पुरती नोंदणी करू शकतील. संपूर्ण भारतात नेक्स्ट परीक्षेतील गुणांच्या आधारेच सरकारी नोकरीस पात्र ठरतील. स्कॉलरशिप आणि फेलोशिपमध्येही याच गुणांच्या आधारे निवड होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()