Meenatai Thackeray : माँसाहेब अर्थात मीनाताई ठाकरे यांचा आज (६ जानेवारी) जयंती दिन. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यात पत्नी मीनाताई ठाकरे यांचा सिंहाचा वाटा होता. शिवसेना घडवण्यात माँसाहेबांनी वेळोवेळी केलेल्या मदतीचे अनेक संदर्भ आपल्याला पहायला मिळतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे देखील मीनाताई ठाकरे यांना खूप मानायचे. आपल्या माँसाहेबांच्या स्वभावाचे विविध पैलू त्यांच्या मुलाखतींतून ऐकायला मिळतात.
राज ठाकरे आणि मीनाताई यांच्यात काय होतं खास नातं ?
मीनाताई ठाकरे यांचं मूळ नाव सरला वैद्य असं होतं. 1948 साली त्यांचा बाळासाहेब ठाकरे यांच्याशी विवाह झाला होता. तर त्यांच्या धाकट्या भगिनी कुंदा उर्फ मधुवंती यांचा विवाह बाळासाहेब ठाकरे यांचे कनिष्ठ बंधु श्रीकांत ठाकरे यांच्याशी झाला होता.
राज ठाकरे हे श्रीकांत यांचे चिरंजीव. त्यामुळे मीनाताई या राज ठाकरे यांच्यासाठी फक्त काकू नव्हत्या तर त्यांच्यात मावशी भाच्याच नातं होतं. राज ठाकरे बालपणापासून अवखळ होते. ते मीनाताई यांना मांसाहेब म्हणायचे. बाळासाहेब व मांसाहेब या दोघांचेही ते लाडके होते. जुन्या मातोश्री मध्येच राज उद्धव जयदेव बिंदा या भावंडांचा बालपण गेलं.
राज ठाकरे देखील त्या आठवणी मध्ये गहिवरतात. आज त्यांच्या वक्तृत्वाचं परखड भाषणांच सगळीकडे कौतुक होतं असतं. मात्र त्यांच्या पहिल्या सभेची एक हळवी बाजू देखील आहे. त्यांनीच ती एका ठिकाणी सांगितली आहे.
ते म्हणतात, “शिवसेनेत असताना मुंबईत माझी पहिली सभा झाली. साधारण पाच मिनिटं मी बोललो असेन आणि सगळा कार्यक्रम संपला. कुणीतरी माझ्याकडे आलं आणि मला सांगितलं की माँ (मीनाताई ठाकरे) आली आहे. मी म्हटलं माँ? मोर्चाला? तर मी सगळ्या गर्दीतून गेलो तर माँ गाडीमध्ये येऊन बसली होती भाषण ऐकायला. मला पाहिल्यावर म्हणाली बस, काका (बाळासाहेब ठाकरे) वाट बघतोय. त्यावेळी दुपारचे अडीच वाजले होते. बाळासाहेबांची झोपायची वेळ, मी विचारलं काका जागा आहे का? तर ती म्हणाली हो. मग मी घरी आलो तर बाळासाहेब बसलेले होते.
"बाळासाहेब ठाकरे मला म्हणाले की तुझं भाषण ऐकल. त्यावेळी मोबाईल वगैरे नव्हते. पण मांसाहेबांच्या सांगण्यावरून कोणी तरी राज ठाकरेंच्या भाषणावेळी पीसीओ वरून बाळासाहेबांना फोन लावला होता आणि स्पीकरवरून माझं भाषण त्यांना ऐकवलं होतं.”राज ठाकरे तो प्रसंग कधीच विसरू शकले नाहीत. असं म्हणतात मीनाताई ठाकरे हयात असत्या तर ठाकरे कुटुंबात दुरावा कधी निर्माणच झाला नसता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.