Maharashtra Politics: "लोकशाहीची कत्तल आणि राष्ट्रगीताचा गैरवापर..." ; महाराष्ट्राच्या राजकारणावर मेहबूबा मुफ्ती यांची टीका

Mehbooba Mufti criticized BJP: जम्मू आणि काश्मिरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य केले आहे. त्यांनी भारतीय जनता पक्षाला या सत्तानाट्यासाठी जबाबदार धरले.
Narendra Modi And Mehbooba Mufti
Narendra Modi And Mehbooba Muftiesakal
Updated on

Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळजनक घटना घडली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते आणि माजी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर महाराष्ट्रातचं नव्हे तर देशाच्या राजकारणात खळबळजनक वातावरण निर्माण झाले.

यावर अनेक राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांकडून प्रतिक्रिया देण्यात आल्या. त्यातच जम्मू आणि काश्मिरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर टीका करत आपले मत व्यक्त केले.

Narendra Modi And Mehbooba Mufti
Maharashtra Politics : सच्चा आणि खरं बोलणारा नेता सत्तेत आला, अजित दादांच्या मनात मी - भाजपा आमदार गणपत गायकवाड

मुंबईमधील राजभवनात आयोजित केलेल्या कार्यक्रमात राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. त्याचबरोबर राष्ट्रावादी कॉंग्रेसच्या ८ आमदारांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली.

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार सामील झाल्यानंतर पिपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी भारतीय जनता पक्षावर आरोप केले. त्या म्हणाल्या की सत्ताधारी पक्ष आमदार खरेदी करत आहेत. त्याचबरोबर त्यांनी भारतीय जनता पक्षावर अनेक आरोप केले.

Narendra Modi And Mehbooba Mufti
Sharad Pawar : मुंबईतील बैठकीविषयी मला माहिती नाही; अजित पवारांच्या बैठकीबाबत शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका

जम्मू काश्मिरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुख्यमंत्री ट्वीट करत म्हणाल्या की, "भाजपने महाराष्ट्रात ज्या पद्धतीने वारंवार जनमत कमकुवत केले आहे, त्याची निंदा करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. लोकशाहीची कत्तल केली जात असून, अशी कृत्य लपवण्यासाठी राष्ट्रगीताचा वापर केला जातोय."

यापुढे त्या म्हणाल्या की, "भाजप एका बाजूला आपल्या राजकीय विरोधकांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अडवकतयं आणि दुसऱ्या बाजूला आमदार विकत घेतायेत. भाजपची सत्तेची तहान भागवण्यासाठी जनतेच्या कष्टाने कमावलेल्या पैशाचा दुरुपयोग केला जात आहे." या ट्वीटच्या माध्यमातून मेहबूबा मुफ्ती यांना भाजप सरकारवर निशाना साधला.

Narendra Modi And Mehbooba Mufti
Maharashtra Politics : 'सबसे पहले मैं ही आया', 'कोणीतरी महाराष्ट्र पॉलिटिक्स समजवा'.. अजित पवारांच्या बंडानंतर मीम्स व्हायरल

उपमुख्यमंत्री अजित पवारांबरोबरच राष्ट्रवादीच्या आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धर्मरावबाब आत्राम, संजय बनसोडे, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, अनिल भाईदास पाटील यांचा समावेश आहे.

Narendra Modi And Mehbooba Mufti
Maharashtra Politics : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! अजित पवारांपाठोपाठ शिंदे-फडणवीस राजभवनाकडे रवाना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.