Pune Bhide Wada : देशात मुलींची पहिली शाळा सावित्रीबाई फुले यांनी १८४८ मध्ये पुण्यातील भिडे वाड्यात सुरू केली होती. हा वाडा महापालिकेच्या ताब्यात देण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
त्यामुळे वाड्यात ‘सावित्रीबाई फुले यांची मुलींची पहिली शाळा' या रूपामध्ये सावित्रीबाई फुले स्मारक उभे राहील, असे राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांनी आज येथे स्पष्ट केले. ( memorial in form of school will be built in Bhide Wada nashik news)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंत्रिमंडळ स्थापन झाल्यावर भिडे वाड्याच्या स्मारकाकडे लक्ष घालण्याची विनंती केली होती. पुरवणी अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून स्मारकासाठी निधीची व्यवस्था होईल, असे सांगून श्री. भुजबळ म्हणाले, सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी पुण्यात अनेक शाळा सुरू केल्या.
मात्र त्यांच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. काही ठिकाणी नवीन इमारती उभ्या राहिल्या आहेत. ही बाब २००२-०३ मध्ये लक्षात आल्यावर विकासकांच्या माध्यमातून काही मार्ग निघतो काय? असा प्रयत्न केला गेला. मात्र त्यात यश आले नाही. पुढे पुणे महापालिकेने भिडे वाडा ताब्यात घेण्याचे ठरवले आणि दुकानदारांनी उच्च न्यायालयात दाद मागितली.
न्यायालयातील सुनावणीसाठी मी आणि माजी खासदार समीर भुजबळ दोघे गेलो होतो. मध्यंतरी, भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू झाली याचा पुरावा काय? अशी चर्चा सुरू झाली. त्या वेळी स्वर्गीय हरी नरके आणि कोल्हापूरच्या प्रा. मंजुश्रीताई पवार यांची पुराव्यासाठी मदत झाली.
डॉ. बाबा आढावांचा सहभाग
भिडे वाड्यासमोर महात्मा फुले समता परिषदेतर्फे आंदोलन झाले. आंदोलनात भरउन्हात ज्येष्ठ डॉ. बाबा आढाव हेही सहभागी झाले होते. अखेर दुकानदारांनी दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळत न्यायदेवतेने कौल दिला. महिलांच्या दृष्टीने ही महत्त्वाची बाब आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांना मानणाऱ्यांच्या दृष्टीने आनंदाचा दिवस आहे, असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.