Mercedes Benz: मर्सिडीज बेंझ महाराष्ट्रात 3,000 कोटींची करणार गुंतवणूक; मोठा रोजगार उपलब्ध होण्याचा उदय सामंतांचा दावा

उदय सामंत सध्या जर्मनीच्या दौऱ्यावर आहेत.
Mercedes Benz_Uday Samant
Mercedes Benz_Uday Samant

मुंबई : महाराष्ट्रात एक मोठा उद्योग येणार असून त्यामुळं मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार असल्याचं उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. ट्विट करुन त्यांनी या उद्योगाबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या कराराची माहिती दिली. (Mercedes Benz will invest 3000 crores in Maharashtra large employment will generate says Udaya Samant)

Mercedes Benz_Uday Samant
Kangana Ranaut: चित्रपटापेक्षा राजकारण कठीण! खासदार कंगनाला झाली उपरती

सामंत यांनी ट्विट करुन सांगितलं की, "आज जर्मनी दौऱ्यावर असताना मर्सिडिझ बेंझ कंपनीच्या प्रतिनिधीसोबत बैठक झाली. मर्सिडिझ बेंझ ही कंपनी यावर्षी महाराष्ट्रामध्ये 3,000 कोटींची गुंतवणूक करणार आहे. यामुळे महाराष्ट्रात उद्योगधंद्यांसह रोजगारात मोठ्या संख्येने वाढ होणार आहे. यासंदर्भातही आज या कंपनीशी चर्चा झाली.

यावेळी मर्सिडीज-बेंझ ग्रुप ऑफ मॅनेजमेंट बोर्डाचे सदस्य आणि पॉलिटिकल ऑपरेशन्स एक्सटर्नल अफेयर्स डॉ. जोर्ग बर्झर, मर्सिडीज-बेंझ ग्रुप एजी संचालक आणि विक्री आणि विपणन मरिना क्रेट्स, मर्सिडीज-बेंझ ग्रुप एजी संचालक आणि प्रदेश ओव्हरसीज मार्टिन शुल्झ यांचा बैठकीत समावेश होता.

यावेळी मर्सिडीज-बेंझ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कार्यकारी संचालन प्रमुख व्यंकटेश कुलकर्णी आदी उपस्थितीत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com