MHADA Lottery 2022 : घर घेऊ पाहणाऱ्यांचा हिरमोड; दिवाळीत सोडत नाहीच!

यंदा ४ हजार घरांसाठी सोडत निघणार होती. पण आता ही प्रक्रिया लांबणीवर पडली आहे.
Mhada-Home
Mhada-Homesakal
Updated on

म्हाडाच्या माध्यमातून मध्यमवर्गीयांना परवडणाऱ्या किमतीमध्ये घरे दिली जातात. मात्र यंदाच्या दिवाळीत म्हाडाच्या लॉटरीचा अर्ज भरू पाहणाऱ्या मध्यमवर्गीयांच्या आनंदावर मात्र पाणी पडणार आहे. यंदा म्हाडाची लॉटरी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

Mhada-Home
Nirmala Sitharaman : दोघेही सारखेच! "डॉलर मजबूत होतोय"च्या चर्चेत नेटकऱ्यांना आठवतायत PM मोदी!

म्हाडाच्या ४ हजार घरांसाठी दिवाळीत लॉटरी निघणार होती. मात्र याची शक्यता आता अगदीच नगण्य झाली आहे. त्यामुळे यंदाची लॉटरी लांबणीवर पडणार आहे. म्हाडाच्या लॉटरीच्या सॉफ्टवेअरचं सध्या काम सुरू आहे. हे काम अजून पूर्ण झालेलं नाही. ते सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे ही लॉटरी प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे घराचं स्वप्न पाहणाऱ्यांना थोडी वाट पाहावी लागणार आहे.

Mhada-Home
Uttar Pradesh : फक्त भाजपा हाच पक्ष मुस्लिमांचा खरा शुभचिंतक; उपमुख्यमंत्र्यांचं विधान

यंदा ४ हजार घरांसाठी सोडत निघणार होती. पण आता ही प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. पुन्हा घरांची सोडत कधी निघणार, याबाबत लवकरच अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यात येईल. सॉफ्टवेअरचं काम पूर्ण झालं की या सोडत प्रक्रियेला सुरुवात होणार आहे, अशी माहिती आहे. या नव्या सॉफ्टवेअरमध्ये काही बदलही असणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()