पुणे : जगभरातील विमानतळांना सेवा देणाऱ्या ‘मायक्रोसॉफ्ट’ची सेवा शुक्रवारी (ता. १९) ठप्प झाल्याने देश-विदेशातील विमानसेवेवर मोठा परिणाम झाला. पुणे विमानतळावरून उड्डाण करणारी १९ आणि पुण्याला येणारी २० विमाने रद्द झाली; तर ३०हून अधिक विमानांना उशीर झाला. बोर्डिंग पासही हाताने लिहून द्यावे लागल्याने नवीन आणि जुन्या टर्मिनलवर प्रवाशांच्या रांगा लागल्या होत्या.
देशात पुण्यासह नागपूर, मुंबई, दिल्ली, बंगळूर, कोलकता आदी विमानतळांवरील सेवेला मोठा फटका बसला. ‘इंडिगो’ची सर्वाधिक विमाने रद्द झाली. विमाने रद्द व उड्डाणांना उशीर झाल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत बिघाड दूर झाला नव्हता.
रद्द झालेली १९ विमाने
पुणे-दिल्ली (२२८५), पुणे-अहमदाबाद (२०१३), पुणे-दिल्ली (२२७८), पुणे-हैदराबाद (१०३), पुणे-कोलकता(६७१), पुणे-इंदूर (२८४), पुणे-बंगळूर (३६१), पुणे-हैदराबाद (३३६), पुणे-चेन्नई (६७४५), पुणे-बंगळूर (६५६४), पुणे-अमृतसर (७२१), पुणे-अहमदाबाद (८१९), पुणे-अहमदाबाद (०५४७), पुणे-वाराणसी (०६७२), पुणे-दिल्ली (२२७९), पुणे-गुवाहाटी (०६२३), पुणे-दिल्ली (२४१९), पुणे-बंगळूर (०९८२), पुणे-दिल्ली (२४१८).
प्रवाशांची गर्दी
पुण्याला येणाऱ्या व जाणाऱ्या विमानांना उशीर होत असल्याने टर्मिनलमध्ये व सिक्युरिटी होल्ड एरियामध्ये प्रवाशांची गर्दी झाली होती. सुदैवाने पुणे विमानतळावरील दोन्ही टर्मिनल सुरू असल्याने प्रवासी दोन टर्मिनलमध्ये विभागले गेले. चेक-इन काउंटरवर रांगा लागल्या होत्या. तसेच वेब चेक-इनसह बोर्डिंग पासची सुविधा बंद असल्याने विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी हस्तलिखित बोर्डिंग पास प्रवाशांना दिले.
विमानतळ प्रशासनाने चेक-इन काउंटरची संख्या वाढवून अतिरिक्त कर्मचाऱ्यांची टर्मिनलमध्ये नियुक्ती केली. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून आवश्यक सूचना दिल्या होत्या.
- संतोष ढोके, विमानतळ संचालक, पुणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.