Sushma Andhare: शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज मुंबईत शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली. मध्यान्ह भोजन योजना घोटाळ्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी त्यांनी गुलाबराव पाटील यांच्या जिल्ह्यातील घोटाळ्याची माहिती दिली. यावेळी ठराविक कंपन्यांना कंत्राट दिले जाते आणि चुकीचे बिलं काढल्याची माहिती सुषमा अंधारे यांनी दिली.
सुषमा अंधारे म्हणाले "मी मागे असं म्हटल की भाजपचे लोक बरेच कागदपत्र पुरवत असतात. मात्र आम्ही आमची शिकार स्वत: करतो. आम्ही मेलेल्या शिकारीवर झडप मारत नाही. यावेळी गिरीश महाजनजी तोऱ्यात म्हणाले, असं काही असेल तर सुषमा ताईंनी दाखवावे. तर भाजपच्या लोकांनी पाठवलेला गठ्ठा मी त्यांना टप्याटप्याने दाखवणार आहे."
सुषमा अंधारे म्हणाले, बांधकाम कामगारांसाठी मध्यान्ह भोजन योजना अस्तित्वात आहेत. माझ्याकडे जळगाव जिल्ह्याची माहिती आहे. गुलाबराव पाटील यांच्या जिल्ह्यात काय सुरू हे पाहावे लागेल. जळगाव जिल्ह्यात २० फेब्रुवारी २३ ला माहिती मागवली होती. त्यांनी मध्यान्ह भोजनाची यादी मागितली होती. किती जणांना मध्यान्ह भोजन दिल्या जाते, याची माहिती मागवण्यात आली होती."
अंधारे म्हणाल्या, यावर ३५-४० हजार कामगारांची यादी आम्हाला देण्यात आली. मात्र त्यांनी एक आकडा सांगितला नाही. ८ मार्चला त्यांनी ही माहिती दिली. दुसरी माहिती ९ मार्चला मागवण्यात आली. टेंडर देण्यात आलेल्या कंपनीची माहिती विचारली. यावर त्यांनी ३० मे ला उत्तर दिले. १५ दिवसांचे मध्यान्ह भोजनाचे बिल ५८ लाख रुपये दाखवले.
ऑक्टोबरचे बिल २. ५७ लाख कोटी रुपयांचे बिल काढले. यावर त्यांनी कर्मचाऱ्यांची संख्या वाढल्याचे सांगितले. पुढे नोव्हेंबर महिन्याच्या बिल ३ कोटी रुपये काढले. डिसेंबरमध्ये ४ कोटी रुपयांचे बिल काढण्यात आले. ही रक्कम जानेवारीत ७ कोटी दाखवली. फेब्रुवारी महिन्यात ८ कोटीपर्यंत बिल दाखवण्यात आले, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.
तसेच योजनेतील कर्मचाऱ्यांची यादी देखील चुकीची आहे. कर्मचाऱ्यांचे फोन इतर राज्यात लागले. १० रुपयात शिवभोजन थाळी मिळते. तरी मध्यान्ह भोजनावर एवढा खर्च कसा होतो, असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. किरीटभाऊंना हे का दिसलं नाही. कदाचित ते वेगळ्या कामात व्यस्त असू शकतात, असा टोला देखील अंधारे यांनी लगावला आहे.
गिरीश महाजन यांना माझ आव्हान आहे. तुम्ही जिल्हा सांगा मी तुम्हाला व्हिडिओ देते. ही सगळी कागदपत्रं भाजपने दिलेली आहेत हे देखील आम्ही सिध्द करू शकतो. पुढे देखील आमच्याकडे अनेक एपिसोड आहेत. पुढचा एपिसोड मागाठाणे विधान सभा क्षेत्राचा आहे, असा इशारा अंधारे यांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.