शासनाकडून जेवढी मदत शक्य आहे, तेवढी मदत देऊ.
रत्नागिरी - एसटी कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला थोडासा उशीर होतो, परंतु यापुढे प्रत्येकवेळी मी त्यांचा पगार देतो आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी असं टोकाचं पाऊल उचलू नये, असे आवाहन राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे. आज रत्नागिरी येथे बोलत होते.
यावेळी ते म्हणाले, शासनाकडून जेवढी मदत शक्य आहे, तेवढी मदत देऊ. आतापर्यंत 2600 कोटी आणि काल जाहील केलेले 122 कोटी इतका निधी शासनाकडून मंजूर करुन कर्मचाऱ्यांचे पगार दिले आहेत. मला या गोष्टीची जाणीव आहे की, पगार द्यायला थोडासा उशीर होतो. परंतु त्यांचे प्रत्येकवेळी पगार दिले आहेत. कर्मचारी कधीच पगारपासून वंचित राहिलेला नाही. अहमदनगर येथे घडलेल्या घटनेबद्दल त्यांनी प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले अहमदनगरमधील शेवगाव येथील एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू ही दुर्दैवी घटना आहे. आज सकाळी त्यांच्या नातेवाईकांशी बोलणे झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही दिले आहे.
पुढे ते म्हणाले, या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांना मी पुन्हा एकदा आवाहन करतो की, एसटी रुळावर आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न चालू आहेत. काल पूर्ण दिवस एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेबरोबर बसून चर्चा केली आहे. 2018 पासून प्रलंबित असणाऱ्या सर्व मागण्या याशिवाय एसटी कामगारांना 28 टक्के महागाई भत्ता आणि वाढीव घरभाडे भत्ता देण्याचे मान्य करण्यात आले आहे. या मागण्या पूर्णपणे मान्य करण्याचे आश्वासनही अनिल परब यांनी दिले आहे. महागाई भत्तासंदर्भात 12 टक्क्यांवरून 28 टक्क्यांपर्यंत जाहीर केला आहे. हा टक्का राज्य शासनाच्या बरोबरीने देण्याचा प्रयत्न केला असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. एसटी कर्मचाऱ्यांसाठी सर्वतोपरी प्रयत्न चालू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढी संदर्भात आपण सकारात्मक असून दिवाळीनंतर याबाबत बैठक घेण्यात येईल, असेही मंत्री ॲड. परब यांनी सांगितले.
दरम्यान, एसटीचे कर्मचारी काल (गुरुवार) मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जातील. जोवर एसटी महामंडळ राज्य शासन स्वतःकडे १०० टक्के हस्तांतरीत करून घेत नाही आणि १ लाख २० हजार कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार व सुविधा मिळत नाहीत तोवर हे आंदोलन थांबणार नाही, अशी घोषणा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.