'मनसेसाठी नाही, तर राज ठाकरे दुसऱ्यासाठी काम करतायत'

Balasaheb Patil vs Raj Thackeray
Balasaheb Patil vs Raj Thackerayesakal
Updated on
Summary

'लोकसभा निवडणुकीवेळी राज ठाकरे 'लाव रे तो व्हिडिओ' या भूमिकेत होते. आता त्यांनी वेगळी भूमिका घेतलीय.'

कऱ्हाड (सातारा) : मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गेल्या पाच-दहा वर्षात अनेकदा राजकीय भूमिका बदलल्या. भाजपची मुंबईतील सभा संपल्यानंतर मनसेची सभा सुरू होते, याचा काहीतरी संबंध असू शकतो. स्वतः च्या मनसेसाठी राज ठाकरे यांचं काम चाललं आहे, असं वाटत नाही तर ते कुणासाठी तरी पूरक काम करत आहेत, असा आरोप सहकारमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी केलाय.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद-संभाजीनगर येथील सभेनंतर सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय. मंत्री पाटील म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानं महसूलात वाढ होत आहे. आता महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi Government) लोकाभिमुख निर्णय घेतले जात आहेत. सत्तेच्या जवळचा मार्ग म्हणून जाती-जातीत मतभेद करण्याचं काम राज्यात सुरू झालंय. अशा प्रकारची राज्याला शोभणारी गोष्ट नाहीय.

Balasaheb Patil vs Raj Thackeray
विरोधकांना मोठा धक्का; राष्ट्रपती निवडणुकीत बीजेडी-वायएसआर भाजपसोबत जाणार?

'दुर्देवानं महाराष्ट्र दिनी राज्यात बुध्दीभेद करण्याचं काम चालू आहे, हे फार चुकीचं आहे. राज ठाकरे यांनी गेल्या पाच-दहा वर्षात अनेकदा राजकीय भूमिका बदलल्या. लोकसभा निवडणुकीवेळी 'लाव रे तो व्हिडिओ' भूमिका होती. आता ते वेगळ्या राजकीय भूमिकेत आहेत. भाजपची मुंबईतील सभा संपल्यानंतर मनसेची सभा सुरू होते, याचा काहीतरी संबंध असू शकतो. त्यांच्या कालच्या सभेवरून ते कुणाला तरी पूरक काम करत आहेत, असं दिसतं आहे.'

Balasaheb Patil vs Raj Thackeray
भोंग्यांबाबत कोणतीही हुकूमशाही चालणार नाही; अजितदादांचा राज ठाकरेंना इशारा

सत्ता न मिळाल्याचा भाजपाला राग

महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला सत्ता येईल, असं वाटत होतं. मात्र राज्यात सोनिया गांधी (Sonia Gandhi), शरद पवार (Sharad Pawar), उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात आलं आहे. तो राग काढण्यासाठी आणि सत्तेवर जाता आलं नाही, म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर जातीयवादाचा आरोप केला जात असून तो पूर्णपणे चुकीचा आहे, असंही सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.