ठिणगी पडली! 'भुजबळांना आवरलं पाहिजे, आम्हीच का सहन करायचं?'; भाजप नेत्याची खदखद समोर

BJP leader Nilesh rane: छगन भुजबळांच्या काही वक्तव्यांमुळे भाजपमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. त्यातच भाजप नेत्याने खदखद व्यक्त केली आहे.
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal
Updated on

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे सध्या चर्चेच आहेत. कालच त्यांनी विधानसभेतील जागांबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. भाजपने आम्हाला ८० ते ९० जागा द्याव्यात. लोकसभेसारखं विधानसभेमध्ये खटपट चालणार नाही असं ते म्हणाले होते. छगन भुजबळांच्या काही वक्तव्यांमुळे भाजपमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. त्यातच भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी छगन भुजबळांबाबत मनातील खदखद व्यक्त केली आहे.

निलेश राणे यांनी 'एक्स'वर एक पोस्ट केली आहे. त्यात ते म्हणालेत की, 'श्री छगन भुजबळांना आवरलं पाहिजे, मी भारतीय जनता पक्षाचा एक लहान कार्यकर्ता असलो तरी आम्ही नेहमी भुजबळांचं का ऐकून घ्यावं? मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू असताना सुद्धा आम्ही त्यांची बाजू घेतली नाही, नेहमी नेहमी भुजबळ हे बीजेपीला डिवचत असतात ही त्यांची भूमिका बरोबर नाही.'

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal : भुजबळ यांच्या नाराजीवर तटकरेंचे ‘ऑल इज वेल’; प्रदेशाध्यक्ष तटकरेंनी घेतली भुजबळांची भेट
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal: विधानसभेत भाजपने राष्ट्रवादीला 'इतक्या' जागा देण्याचा शब्द दिलाय; भुजबळांचा दावा

आम्हाला असंच पाहिजे आम्हाला तसंच पाहिजे, युती आघाड्या करून ही भाषा एका नेत्याला शोभत नाही. आम्ही तुमच्या वयाचा आदर करतो पण उठ सूट कोण युती बिघडवायची भाषा बोलत असेल तर सहन होत नाही आणि होणार नाही. कारण भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष असून सुद्धा नेहमी सकारात्मक भूमिका ठेवली आहे, असं देखील राणे म्हणाले आहेत.

छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया

भाजपमधील नाराजीनंतर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजप मोठा भाऊ आहे. त्यामुळे त्यांना जास्त जागा मिळतील. पण, आमचा देखील सन्मान राखला पाहिजे. संविधान बदलाच्या आरोपाचे परिणाम लोकसभेवर जाणवले. आमच्या विचारधारेत मनुस्मृतीला स्थान नाही. आम्ही शाहू-फुले-आंबेडकरांचे विचार मानणारे आहोत, असं भुजबळ म्हणाले.

तिघांमध्ये भाजप मोठा भाऊ आहे. त्यांचे १०० पेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे त्यांना मोठा वाटा मिळेल. त्यांनी सांगितलं दुसऱ्या पक्षांचा देखील मान-सन्मान राखला जाईल. मग ठीक आहे. आम्हाला देखील योग्य जागा मिळतील, असं ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.