मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याचा कट रचला जात असल्याची माहिती पत्राद्वारे देण्यात आली आहे. नाशिकच्या कार्यालयात यासंदर्भात त्यांना पत्र देण्यात आलंय. याप्रकरणी भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जीवे मारण्याचा कट रचला जात असल्याचं सांगणारे पत्र आले आहे. याआधीही मला मारण्याची धमकी आल्या आहेत, तसे प्रयत्न देखील झाले आहेत. खूपवेळा असं झालं आहे. सर्व पोलिसांवर सोडून द्यायचं असतं, असं ते म्हणाले.
आपण घरी बसू शकत नाही. तसेच घेतलेली जी भूमिका आहे, विचारसरणी आहे ती बदलू शकत नाही. पोलिसांना सर्व माहिती देण्यात आली आहे. पोलीस प्रकाराचा तपास करतील आणि काय खोटंय-खरंय समोर आणतील. अलीकडे जे प्रकार महाराष्ट्रात घडताहेत. त्यामुळे देखील आमच्या कार्यकर्त्यांनी ताबडतोब पोलिसांना यासंदर्भात कळवलं आहे, असं भुजबळ म्हणाले.
मोबाईल क्रमांक, गाड्यांचे क्रमांक, पाच जणांची बैठक कुठे झाली याची माहिती मिळाली आहे. ज्या हॉटेलसमोर बैठक झाली ती सर्व माहिती पोलिसांना आम्ही दिली आहे. पोलीस योग्य ती कार्यवाही करतील. पूर्वी धमकी दिली जात होती पण आता नियोजित कट रचण्यात आला आहे. जे आहे ते आहे. पोलीस आवश्यक ती कारवाई करतील, असंही ते म्हणाले. कितीही धमकी आल्या आणि त्याची अंमलबजावणी झाली तरी मी मागे हटणार नाही, असं भुजबळ म्हणाले.
मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिक येथील कार्यालयात एक पत्र आलं होतं. यात त्यांना जीवे मारण्याचा कट रचला जात असल्याची माहिती देण्यात आली होती. साहेब तुम्हाला उडवण्याची सुपारी पाच लोकांनी घेतली आहे. ते गंगापूर-दिंडोरी-चांदशी इथं हॉटेलमध्ये थांबले आहेत. या लोकांनी तुम्हाला उडवण्याची ५० लाखांची सुपारी घेतली आहे, असं या पत्रामध्ये म्हणण्यात आलं आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांनी भुजबळांची सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे. (Latest Maharashtra News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.