Dhananjay Munde: "सहा हजार मतांनी इज्जत गेली, खोलवर जखम झाली" लोकसभा निकालाबाबत मंत्री धनंजय मुंडेंची खंत

Beed Lok Sabha Pankaja Mude: दिवंगत बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना वाईट वाटले दिवंगत गोपीनाथराव मुंडे नसताना त्यांचं नाव घेऊन बदनाम केले जात आहे.
Dhananjay Munde Pankaja Munde
Dhananjay Munde Pankaja MundeEsakal
Updated on

Minister Dhananjay Munde regrets Pankaja Munde's defeat in Beed Lok Sabha:

लोकसभा निवडणुकीत सहा हजार मतांनी आमची इज्जत गेली. हा निकाल म्हणजे खूप खोलवर झालेली जखम आहे. ही जखम अद्याप भरलेली नाही, अशी खंत राज्याचे कृषीमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचा मेळावा सोमवारी (ता. नऊ) माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

धनंजय मुंडे म्हणाले, बीड लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या पराभवाची सल अद्यापही मनात आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मौलाना आझाद अल्पसंख्यांक महामंडळासाठी दीड हजार कोटी रुपये मागणी केली होती. मात्र, तत्कालीन सरकारने दमडीही दिली नाही. अजित पवार या सरकारमध्ये आल्यानंतर निधी मंजूर झाल्याचा दावा धनंजय मुंडे यांनी केला.

Dhananjay Munde Pankaja Munde
Nagpur Hit And Run Video: "त्या मुलाला वाचवण्यासाठी..." नागपूर ऑडी अपघाताचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

दिवंगत बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना वाईट वाटले दिवंगत गोपीनाथराव मुंडे नसताना त्यांचं नाव घेऊन बदनाम केले जात आहे. गोपीनाथ मुंडे हे शिलेदार राहिले आहेत. त्यांची बदनामी करण उद्धव ठाकरे यांना शोभत नाही, असे 'भाजपने गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून शिवसेनेच्या जागा पाडण्यासाठी प्रयत्न केले, त्यासाठी खतपाणी घातले, या शिवसेनेच्या मुखपत्रातून केलेल्या लेखाबद्दल त्यांनी मत मांडले.

Dhananjay Munde Pankaja Munde
Chandrashekhar Bawankule: "ती गाडी माझ्या मुलाच्या नावे," नागपूर हिट अँड रन प्रकरणी काय म्हणाले बावनकुळे? पाहा व्हिडिओ

संजय राऊत शिवसेना पूर्णपणे पाण्यात घातल्याशिवाय राहणार नाहीत, दिंवगत मुंडे असताना काहीही बोलले नाहीत. ते नसताना त्यांच्याबद्दल बोलताना संजय राऊतांना लाज वाटली पाहिजे, अशी टीकाही धनंजय मुंडे यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()