'तोपर्यंत महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही', एकनाथ शिंदे आक्रमक

Eknath Shinde on Chhatrapati Shivaji Maharaj
Eknath Shinde on Chhatrapati Shivaji Maharajsakal media
Updated on

मुंबई : कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj Statue Vandalized ) यांचा अवमान केल्याची घटना घडली. त्यामुळे शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत. आता मंत्री एकनाथ शिंदे (Minister Eknath Shinde) यांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे. तसेच महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सर्व शिवप्रेमींच्या मागे महाराष्ट्र सरकार ठामपणे उभं आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Eknath Shinde on Chhatrapati Shivaji Maharaj
'शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही, हा भाजपचा कट'

गुन्हेगाराला तातडीने अटक करा -

''कर्नाटकमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना (Chhatrapati Shivaji Maharaj Statue Vandalized) करणाऱ्या गुंडांचा आम्ही निषेध करतो. महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सर्व शिवप्रेमींच्या मागे महाराष्ट्र सरकार ठामपणे उभं आहे. कर्नाटक सरकारने बेळगाववर हक्क सांगण्यासाठी तिथे अधिवेशनाचा घाट घातलाय. बंगळुरूमधील गुन्हेगाराला तातडीने अटक व्हावी आणि अनधिकृत लाल-पिवळ्या ध्वजाचं स्तोम थांबवावं, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

'...तोपर्यंत महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही' -

बेळगावमधील मराठी भाषिकांवर कर्नाटकमध्ये अत्याचार होत असल्याचा आरोप शिवसेनेकडून वारंवार केला जातो. त्यावरून देखील एकनाथ शिंदे आक्रमक झाले. ''मराठी जनतेवरील अन्यायामुळे आपण यशस्वी होऊ असा कर्नाटकचा समज असेल तर त्यांनी तो मनातून काढून टाकावा. रस्त्यावरच्या आणि न्यायालयातील दोन्ही लढ्यांत विजय मिळेपर्यंत महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही'', असं एकनाथ शिंदे म्हणाले.

नेमकी काय आहे घटना? -

बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर बेळगावमधील शिवप्रेमी आक्रमक झाले असून काल हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले होते. याठिकाणी तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जमावाने शुक्रवारी रात्री पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली. तसेच आज देखील महाराष्ट्र एकीकरण समितीकडून याठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.