Hasan Mushrif : मराठा आरक्षण रद्द होण्यामागची खरी कारणं लोकांना माहिती आहेत; हसन मुश्रीफांचा कोणावर निशाणा?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे चिन्ह असणार आहे.
Hasan Mushrif
Hasan Mushrifesakal
Updated on
Summary

सुप्रिया सुळेंविरुध्द सुनेत्रा पवार असतील याबद्दल आपल्याला माहिती नसल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.

कोल्हापूर : ‘मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्यावरून विरोधक-सत्ताधाऱ्यांनी एकमेकांवर दोषारोप करण्यापेक्षा सर्वांनी आरक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यात होत असलेला बंद शांततेत पार पाडावा,’ असे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जनता दरबारानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. यासाठी यापूर्वीही झालेल्या आंदोलनात आम्ही सहभागी होतो. मंत्रालयात बैठकही घेतली. मुस्लिम बोर्डिंग येथील उपोषणामध्ये सहभागही घेतला.

Hasan Mushrif
Shambhuraj Desai : 'मराठा समाजानं शांतता राखावी, अफवांवर विश्वास ठेऊ नये'; उदनराजेंच्या भेटीदरम्यान मंत्री देसाईंचं आवाहन

आरक्षणामध्ये असणाऱ्या पन्नास टक्केच्या अटीमुळे काही अडचणी आल्या आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी महायुती सातत्याने प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेही यासाठी प्रयत्नशील आहेत. आजचा बंद हा शांततेत आणि कोल्हापूरच्या वैभवात भर पडेल, असा करावा.’

Hasan Mushrif
Kolhapur Bandh : मराठा आंदोलकांवर अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ कोल्हापूर आज बंद; सर्व शाळांना सुटी जाहीर

महाविकास आघाडीच्या काळात मराठा आरक्षण रद्द झाल्याची टीका होत आहे, यावर बोलताना मुश्रीफ म्हणाले, ‘आरक्षण रद्द होण्यामागची खरी कारणे लोकांना माहिती आहेत. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश काय आहेत, हेही माहिती आहे. त्यामुळे सर्वांनी आता एकमेकांवर दोषारोप करण्यापेक्षा मराठा समाजाला आरक्षण कसे देता येईल, याचा विचार केला पाहिजे. यामध्ये राजकारण करण्याची गरज नाही, असंही मुश्रीफांनी स्पष्ट केलं.

बहुसंख्य पदाधिकारी अजित पवारांसोबत

‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे चिन्ह असणार आहे. बहुसंख्य पदाधिकारी हे अजित पवार यांच्यासोबत आहेत. त्यामुळे यात कोणतीही अडचण येणार नाही, तसेच सुप्रिया सुळेंविरुध्द सुनेत्रा पवार असतील याबद्दल आपल्याला माहिती नसल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.

Hasan Mushrif
Jalna Maratha Andolan : लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ साताऱ्यात कडकडीत बंद; एसटीच्या तब्बल 634 फेऱ्या रद्द, मतदानावर बहिष्काराचा इशारा

जनता दरबारात १९७ अर्ज

दरम्यान, मंत्री हसन मुश्रीफ यांनी लोकांचे प्रलंबित प्रश्‍न सोडवण्यासाठी बोलवलेल्या जनता दरबाराला चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात झालेल्या या दरबारात विविध खात्यांशी संबंधित १९७ जणांचे अर्ज दाखल झाले. या सर्व अर्जांवर एक महिन्यात कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यापुढे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या उपस्थितीत जनता दरबार होईल, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.