Shiv Sena : 2024 मध्ये महाविकास आघाडीचं पानिपत होणार; मंत्री संदीपान भुमरेंचं मोठं भाकीत

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटातील नेते शिंदे गटावर चिडून आहेत.
Uddhav Thackeray and Sandipan Bhumre
Uddhav Thackeray and Sandipan Bhumreesakal
Updated on
Summary

छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) 2 एप्रिलला महाविकास आघाडीची सभा होत आहे. या सभेवरही मंत्री भुमरे यांनी भाष्य केलं.

Sandipan Bhumre News : एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत (Shiv Sena) बंड करुन राज्यात सत्तांतर घडवून आणलं, तेव्हापासून महाविकास आघाडीविरुध्द (Mahavikas Aghadi) शिंदे गट (शिवसेना) असा सामना पहायला मिळत आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटातील नेते शिंदे गटावर चिडून आहेत. त्यातच आता मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी मोठं वक्तव्य केलंय. कितीही सभा घेतल्या तरी 2024 मध्ये महाविकास आघाडीचं पानिपत होणार असल्याचं वक्तव्य मंत्री संदीपान भुमरे यांनी केलंय.

Uddhav Thackeray and Sandipan Bhumre
Politics : 2024 मध्ये पुन्हा भाजपचीच सत्ता, आम्ही चौघंही आमदार होणार; BJP आमदाराचं मोठं भाकीत

ते बीड जिल्ह्यातील नारायणगड (Beed Narayangad) इथं बोलत होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) 2 एप्रिलला महाविकास आघाडीची सभा होत आहे. या सभेवरही मंत्री भुमरे यांनी भाष्य केलं. एकत्र येऊन सभा घेण्यापेक्षा एकट्यानं सभा घेऊन दाखवावी. येत्या काळात महाविकास आघाडीच्या सभेपेक्षा शिवसेनेची सभा किती मोठी होणार आहे हे सर्वांनी पाहावं, असं आव्हानच भुमरेंनी मविआला दिलं आहे.

Uddhav Thackeray and Sandipan Bhumre
VIDEO : भररस्त्यात आयोगाच्या पथकाकडून मुख्यमंत्र्यांच्या गाडीची झाडा-झडती; बोम्मईंच्या कारमध्ये काय सापडलं?

शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी नारायणगड इथं जाऊन विठ्ठलाच दर्शन घेतलं, त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. शिवाय, त्यांनी उद्धव ठाकरे गटावरही हल्लाबोल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.