सातारा : सध्या महाविकास आघाडीचे सरकार कोविड संसर्ग रोखण्याच्या लढाईत गुंतलेले आहे. त्यामुळे कोणी कितीही आदळ-आपट केली, तरी या सरकारवर किंचितसाही फरक पडणार नाही. महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे 200 टक्के पूर्ण करेल. पुढील दहा वर्षेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करेल. विरोधकांनी आपला वेळ व्यर्थ घालवू नये, असा सल्ला गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विरोधकांना दिला आहे.
पोलिस खात्याकडून सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे वक्तव्य गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्र्यांकडून अधिकची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न पत्रकारांनी केला. त्यावर मंत्री देसाई म्हणाले, ""यासंदर्भात माझी गृहमंत्री देशमुख यांच्याशी अद्याप चर्चा झालेली नाही. मी आज पाटण तालुक्यात कोविड सेंटर सुरू करण्याच्या कामात व्यस्त होतो. मी स्वतः गृहमंत्री देशमुख यांच्याशी चर्चा करून माहिती घेणार आहे.
एक मराठा लाख मराठा... साताऱ्यात घुमला मराठ्यांचा आवाज
सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार भक्कम विचाराने बनले आहे. शिवसेनेचे नेतृत्व असलेल्या या सरकारला राष्ट्रवादी व कॉंग्रेसने भक्कम पाठिंबा दिला आहे. कोणी कितीही प्रयत्न केला तरी हे महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षांचा कार्यकाल 200 टक्के पूर्ण करेल. तसेच पुढील दहा वर्षेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच काम करेल. त्यामुळे विरोधकांनी आपला वेळ व्यर्थ घालवू नये.''
साता-याचं वातावरण एकदम कुल, चला शहर बनवूया कलरफुल!
सध्या महाविकास आघाडीच्या सरकारने कोविडचा संसर्ग रोखण्याला प्राधान्य दिलेले आहे. इतर कोणत्याही बाबीला प्राधान्य राहणार नाही.'' सरकार पाडण्याचा प्रयत्नात असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांची नावे गृहमंत्र्यांकडे असतील तर तेच याबाबत निर्णय घेतील, असेही त्यांनी नमूद केले.
केवळ कोविड संसर्ग परतविणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे विरोधकांनी कितीही आदळ-आपट केली तरी किंचितसाही फरक या सरकारवर पडणार नाही.
-शंभूराज देसाई, गृहराज्यमंत्री
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.