आमचा एकही आमदार नाराज नाही, उलट राष्ट्रवादीची मंडळी शिंदे गटाच्या संपर्कात; देसाईंचा गौप्यस्फोट

'आमदारांची मनं कळायला जयंतराव मनकवडं आहेत का?'
Minister Shambhuraj Desai criticizes Jayant Patil
Minister Shambhuraj Desai criticizes Jayant Patilesakal
Updated on
Summary

'आमदारांची मनं कळायला जयंतराव मनकवडं आहेत का?'

सातारा : आमदारांची मनं कळायला जयंतराव मनकवडं आहेत का, असा प्रश्न उपस्थित करून मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वाखालील एकही आमदार नाराज नाही. उलट राष्ट्रवादीकडील काही मंडळी आमच्या संपर्कात असून, त्यांना अडविण्यासाठी जयंत पाटील (Jayant Patil) असे वक्तव्य करत आहेत, असा टोला उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी लगावला.

मंत्री देसाई यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. देसाई म्हणाले, ‘‘एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील एकही आमदार नाराज नाही. उलट राष्ट्रवादीकडील (NCP) काही मंडळी आमच्या संपर्कात आहेत. त्यांना शिंदे गटात जाण्यापासून तटवून ठेवण्यासाठी जयंतराव असे वक्तव्य करत आहेत. शिंदे गटाचा दसरा मेळाव्याचे जोरदार नियोजन सुरू आहे. त्यासाठी गटाचे सर्व नेत्यांवर चार-चार जिल्ह्यांची जबाबदारी दिली आहे. त्या जिल्ह्यांचे दौरे करून आम्ही वातावरण निर्मिती करत आहोत.’’ शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील आजपर्यंत झाला नाही, असा प्रचंड दसरा मेळावा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Minister Shambhuraj Desai criticizes Jayant Patil
Kolhapur : 'मला माफ करा, गुडबाय लाईफ' असं स्टेट्स टाकून 21 वर्षीय तरूणीचा खून

जयंत पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना देसाई म्हणाले, ‘‘आमदारांची मनं कळायला जयंतराव मनकवडे आहेत का, असा प्रश्न उपस्थित करून सहकार, शिक्षण क्षेत्रात त्यांचे चांगले काम आहे. वित्तमंत्री म्हणून त्यांनी चांगले काम केले आहे. कोणाच्या मनात काय आहे याचे त्यांना नवीन ज्ञान झालेले दिसत आहे.’’

Minister Shambhuraj Desai criticizes Jayant Patil
Muslim Couples : वाह.. क्या बात है! मुस्लिम दाम्पत्यानं हिंदू मंदिराला दान केली 'इतकी' मोठी रक्कम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.