Maratha Reservation : आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला सर्व सोयी-सुविधा देणार; मंत्री शंभूराज देसाईंची घोषणा

आरक्षणाबाबत शासन स्तरावर विचार विनिमय सुरू आहे.
Maratha Reservation Shambhuraj Desai Eknath Shinde
Maratha Reservation Shambhuraj Desai Eknath Shindeesakal
Updated on
Summary

सरकार सकारात्मक आहे. इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जाणार आहे.

सातारा : कुणबी दाखले देण्याबाबत विधी व न्याय विभागाचे मत घेऊनच निर्णय घेतला आहे. इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) दिले जाणार आहे. या आरक्षण प्रश्नावर संवेदनशील असून, मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत गप्प बसणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केले आहे.

तसेच आरक्षण मिळेपर्यंत समाजाला सर्व सोयी, सुविधा दिल्या जात आहेत, अशी माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) नेतृत्वाखालील सरकार दीड कोटी लाभार्थ्यांपर्यंत पोचले आहे. मात्र, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कधीच शेतकऱ्यांच्या बांधावर गेले नाहीत. ते ऑनलाइन मुख्यमंत्री होते, अशी टीका त्यांनी केली.

Maratha Reservation Shambhuraj Desai Eknath Shinde
मराठ्यांना 'ओबीसी'तून आरक्षण दिल्यास OBC समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही; काँग्रेस नेत्याचा स्पष्ट इशारा

उद्धव ठाकरेंनी नगर दौऱ्यात शासन आपल्या दारी योजनेवरून मुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली आहे. त्या टीकेला उत्तर देण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. शंभूराज देसाई म्हणाले, ‘‘दुष्काळाबाबत आमचे सरकार संवेदनशील असून, त्याला कसे तोंड द्यायचे याचे नियोजन केलेले आहे. उद्धव ठाकरे यांनी शासन आपल्या दारी उपक्रमावर आक्षेप घेत टीका केली असून, त्यांचे वक्तव्य निराधार आहे.

ते जाणीवपूर्वक टीका करत आहेत. आमचे सरकार दीड कोटी लाभार्थ्यांपर्यंत पोचले आहे. ते मुख्यमंत्री असताना कधीच शेतकऱ्यांच्या बांधावर गेले नाहीत. ते ऑनलाइन मुख्यमंत्री होते. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आम्हीही होतो. त्या वेळी ते मुख्यमंत्री असताना प्रत्येक जिल्ह्यात जाऊन आपण तेथील प्रश्न सोडवू, असे सांगितले होते; पण त्यांनी आमचे ऐकले नाही. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गावागावांत पोचले आहेत.’’

Maratha Reservation Shambhuraj Desai Eknath Shinde
Loksabha Election : भाजप लोकसभेत घेणार काँग्रेसचा बदला! 'हा' हुकमी एक्का काढला बाहेर, राष्ट्रीय राजकारणात होणार दमदार एन्ट्री?

वैयक्तिक लाभांच्या योजना लोकांना घरापर्यंत मिळाल्या आहेत. आमच्या चांगल्या उपक्रमाकडे जनतेचे लक्ष जातेय म्हणून ते टीका करत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर शंभूराज देसाई म्हणाले, ‘‘जरांगे पाटील यांच्या आग्रहानुसार कुणबी दाखले देण्याबाबत विधी व न्याय विभागाचे मत घेऊनच शासन निर्णय घेतला आहे. या निर्णयात सुधारणा करावी, अशी त्यांची मागणी आहे. शासन स्तरावर विचार विनिमय सुरू आहे.

Maratha Reservation Shambhuraj Desai Eknath Shinde
Maratha Reservation चा तिढा सुटणार? जरांगे पाटलांच्या शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा, मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या बैठकीत काय घडलं?

पालकमंत्री पत्रकारांवरच भडकले...

सरकार सकारात्मक आहे. इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जाणार आहे. सुप्रिम कोर्टात रिव्हीव पिटीशन कोण मुख्यमंत्री असताना फेटाळली याची माहिती घेतली जात आहे. क्युरेटिव्ह पिटीशन सुनावणीला येईल, याची वाट पाहात असून, मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत संवेदनशील असून, मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत गप्प बसणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केले आहे. आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला सर्व सोयी, सुविधा दिल्या जात आहेत.

Maratha Reservation Shambhuraj Desai Eknath Shinde
Maratha Reservation : मराठ्यांना सरसकट आरक्षण दिल्यास कायदेशीर अडचणी येऊ शकतात? बैठकीत अधिकाऱ्यांनी मांडली मतं

अजित पवारांच्या दौऱ्याची माहितीच नाही...

उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी साताराच्या दौऱ्यावर असून, त्यांचे तुम्ही स्वागत करणार का, या प्रश्नावर मंत्री देसाई यांनी मला अजित पवार यांच्या दौऱ्याची माहिती नाही, असे सांगितले. त्यांचा तो दौरा खासगी, की शासकीय याची माहिती घेतली पाहिजे. नाहीतर त्यांचे खासगी दौरे जिल्ह्यात असतातच असेही ते म्हणाले. त्यानंतर माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी अजित पवारांच्या दौऱ्याची माहिती दिल्याचे पत्रकारांनी सांगताच त्यांचा शासकीय दौरा असेल, तर उपमुख्यमंत्री म्हणून आम्ही त्यांचे स्वागत करू, असे त्यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()