Uday Samant : विधिमंडळ अधिवेशनात स्वतःचा रेकॉर्ड मोडीत काढत मंत्री सामंतांनी केला नवा रेकॉर्ड; असं नेमकं काय घडलं?

राज्य विधिमंडळाचे अधिवेशन नागपूर (Nagpur Winter Session) येथे सुरू आहे.
Nagpur Winter Session Uday Samant
Nagpur Winter Session Uday Samantesakal
Updated on
Summary

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनातील कामकाजात पुन्हा अव्वल स्थान मिळवले आहे.

रत्नागिरी : राज्य विधिमंडळाचे अधिवेशन नागपूर (Nagpur Winter Session) येथे सुरू असून महाराष्ट्राचे उद्योगमंत्री, रत्नागिरी-रायगडचे पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी स्वतःचे रेकॉर्ड मोडीत काढत नवे रेकॉर्ड केले आहे. नागपूर अधिवेशन काळात त्यांनी २९ लक्षवेधी आणि प्रश्नोत्तर काळात १८ प्रश्न मांडले.

अर्धा तास चर्चेमध्ये ३ वेळा सहभाग घेतला. २ शासकीय विधेयके मांडली. ६ कागदपत्रे त्यांच्या माध्यमातून पटलावर ठेवण्यात आली, तर ४ पुरवणी मागणी चर्चेमध्ये त्यांनी सहभाग घेतला. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनातील कामकाजात पुन्हा अव्वल स्थान मिळवले आहे.

Nagpur Winter Session Uday Samant
Kolhapur Politics : 'अजून दोन टर्म मीच आमदार होणार'; पत्रकारांनी 'तो' प्रश्न विचारताच मुश्रीफांनी जोडले हात!

आपल्या कामाचा धडाका लावत वेगळी छाप महाराष्ट्रावर उटवली आहे. त्याचेच एक उदाहरण म्हणून राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये गेल्या वेळेस उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अव्वल काम केल्याचे रेकॉर्डवर आले होते. त्याची नोंद अधिवेशन काळात झाली होती. त्यांनी नागपूर अधिवेशनात स्वतःचेच रेकॉर्ड मोडीत काढले आहे.

Nagpur Winter Session Uday Samant
Kirit Somaiya : सोनिया-राहुल गांधींचा जयजयकार करणाऱ्यांना आता राम आठवला का? सोमय्यांचा ठाकरे-राऊतांवर घणाघात

नागपूर अधिवेशनात १ आपत्कालीन चर्चेतही त्यांनी आपला सहभाग नोंदवला. मुंबई येथे झालेल्या अधिवेशनात त्यांनी रेकॉर्ड केले होते. त्यापेक्षाही उत्तम आणि अव्वल दर्जाचे काम केल्याचे पुन्हा एकदा त्यांच्या कामगिरीवरून स्पष्ट झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.