महाराष्ट्र पेटवण्याचं ते षडयंत्र होतं; यशोमती ठाकूर यांचा घणाघात

yashomati thakur
yashomati thakuresakal
Updated on

यवतमाळ : महाराष्ट्र पेटवण्याचं ते षडयंत्र होतं. महाराष्ट्राची सत्ता हातात घेण्यासाठी पेटवायचा डाव होता, असा आरोप अमरावतीच्या (amravati) पालकमंत्री आणि राज्याच्या महिला व बाल कल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर (yashomati thakur) यांनी विरोधी पक्षांचं नाव न घेता केला. आणखी ही काही गंभीर आरोप यशोमती ठाकूर यांनी केले आहेत.

श्रीराम म्हटलं की संपला का सगळं, संपला का संविधान?

जय श्रीराम म्हटलं की संपला का सगळं, संपला का संविधान? असा सवाल यशोमती ठाकूर यांनी केला. देशात जातीय दंगली घडवल्या जातात. दोन्ही कट्टरपंथी हे चांगले मित्र असतात आणि आपल्याला येडं बनवतात. आपल्या देशात तिरस्काराची भावना वाढवण्याचं काम सुरु आहे, असं महिला व बालकल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेत, त्या माजी आमदार अनंतराव देवरसकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.

yashomati thakur
कोरोना व्हेरिएंटचा फटका, गुंतवणूकदारांचे 7 लाख कोटी बुडाले

आपल्या देशात काय चाललंय?

काही लोक अमरावती शहरात आतंक करत होते. त्यावेळी काही मुस्लीम लोकं मंदिराचं रक्षण करत होते. तर, काही हिंदू लोकं मशिदीचं रक्षण करत होते. हाच माझा देश आहे. माझा धर्म आणि माझी जात हा तिरंगाच आहे, असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे. आजच्या दिवशी मी बोलली नाही तर कुठंतरी चुकल्या सारखं होईल, मी जय श्रीराम म्हणाले नाही, राम रहीम म्हटलं नाही. मी संविधान साजरा केला त्यासाठी वेळ झाला. अमरावती 12 तारखेला मोर्चा झाला, नको त्या घटना घडल्या. त्यानंतर मी फेसबुक लाईव्ह केलं. त्याच्या खालच्या कमेंट वाचल्या आणि आपल्या देशात काय चाललंय असा प्रश्न पडल्याचं यशोमती ठाकूर म्हणाल्या.

yashomati thakur
छत्तीसगड : कुख्यात नक्षलवादी चकमकीत ठार, CRPF ची माहिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.