Microsoft Update Issue : बँकांना किरकोळ अडथळे

मायक्रोसॉफ्टच्या सेवेतील तांत्रिक बिघाडामुळे दहा बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय संस्थांच्या कामकाजात किरकोळ अडथळा निर्माण झाला.
Microsoft Update Issue
Microsoft Update Issuesakal
Updated on

मुंबई : मायक्रोसॉफ्टच्या सेवेतील तांत्रिक बिघाडामुळे दहा बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय संस्थांच्या कामकाजात किरकोळ अडथळा निर्माण झाला. हे अडथळे दूर करण्यात आले, असे भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) म्हटले आहे. मायक्रोसॉफ्टच्या तांत्रिक समस्येमुळे जगभरातील विमान उड्डाणे, बँका, माध्यमे आणि तंत्रज्ञान कंपन्यांचे कामकाज विस्कळीत झाले.

बहुतेक बँकांच्या महत्त्वाच्या प्रणाली क्लाउड यंत्रणेमध्ये नाहीत. तसेच फक्त काही बँका क्राउडस्ट्राइक टूल वापरत आहेत. त्यामुळे बँकांच्या कामकाजावर विशेष परिणाम झाला नाही. या तांत्रिक अडचणीचा आरबीआयचे नियमन असलेल्या संस्थांवर काय परिणाम झाला याचे मूल्यांकन करण्यात आले, त्यात केवळ दहा बँका आणि एनबीएफसींच्या कामकाजात किरकोळ अडथळे आल्याचे दिसून आले.

त्यापैकी अनेक अडथळे दूर करण्यात आले आहेत किंवा दूर केले जात आहेत, असे आरबीआयने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. रिझर्व्ह बँकेने बँका, एनबीएफसींना सतर्क राहण्यासाठी आणि कामकाजात अडथळा येऊ नये यासाठी आवश्यक पावले उचलण्याचा सल्ला दिला आहे.

मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या सेवेतील बिघाडाचा स्टेट बॅंक आॅफ इंडियाच्या यंत्रणेवर विशेष परिणाम झालेला नसून, आमचे कामकाज व्यवस्थित सुरू आहे.

- दिनेश कुमार खारा, अध्यक्ष, एसबीआय

आर्थिक देवाणघेवाण करण्यासाठी देशात सर्वांत लोकप्रिय असलेल्या ‘यूपीआय’सह आर्थिक व्यवहारांसाठी वापरण्यात येणाऱ्या कोणत्याही यंत्रणांवर मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या सेवेतील बिघाडाचा कोणताही परिणाम झालेला नाही.

- दिलीप असबे, मुख्य कार्यकारी अधिकारी, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन आॅफ इंडिया

मायक्रोसॉफ्टच्या सेवेत झालेल्या बिघाडाचा आमच्या यंत्रणांवर आणि बॅंकेच्या दैनंदिन कामकाजावर कोणताही परिणाम झालेला नाही.

- रमेश लक्ष्मीनारायण, आयटी विभागाचे समूह प्रमुख, एचडीएफसी बँक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.