"शिवसेनेचा कोणताही वाण आला तर शिंदेच्या बाणापुढे टिकू शकणार नाही" - सत्तार

आपली शिवसेना ही ओरिजनल आहे असं आमदार अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.
अब्दुल सत्तार
अब्दुल सत्तार सकाळ
Updated on

मुंबई : ओरंगाबादमधील शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि आमदारांच्या सत्काराचं आयोजन केलं होतं. मुंबईतील रविंद्र नाट्य मंदिर येथे शिंदे यांच्या सत्काराचं आयोजन केलं असून यामध्ये शिंदे सरकारमधील आमदारांनी उपस्थिती लावली होती. शिंदे यांचं सरकार स्थापन झाल्यावर आमच्या मतदारसंघाला निधी मिळाला असं आमदार अब्दुल सत्तार (MLA Abdul Sattar) म्हणाले. त्याचबरोबर ही शिवसेना ओरिजनल असून यापुढे शिवसेनेचे कोणतेही नवीन वाण टिकणार नाहीत असा टोला त्यांनी लावला.

(Abdul Sattar On Shivsena)

"जगातल्या कोणत्याही राज्यात मुख्यमंत्री होणार नाही असा मुख्यमंत्री आपल्याला लाभला आहे. आपण कोणतीही गोष्ट लपवून करत नाही. माझ्या मतदारसंघात हिंदू मतदारांची लोकसंख्या जास्त आहे पण मला ते निवडून देतात. आपली शिवसेना ओरिजनल आहे आणि जुन्या शिवसेनेचा कोणताही वाण आला तर शिंदेच्या बाणापुढे टिकू शकणार नाही." असा टोला त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना लावला आहे.

शिंदे यांनी रात्री दोन वाजता माझ्या नगपालिकेसाठी २० कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यांचे उपकार मी विसरणार नाही. त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना पेन चालवण्यामध्ये अडचणी होत्या पण आता ती अडचण शिंदे यांनी सोडवली आहे. त्यांच्या उपकाराची परतफेड आम्ही करू शकत नाही असंही ते यावेळी म्हणाले.

अब्दुल सत्तार
फडणवीस- राज ठाकरेंमध्ये दोन तास बैठक; नांदगावकर म्हणाले...

"ज्याला काही अक्कल नाही तेही नक्कल करण्याचा प्रयत्न करतात. पण आम्ही इमानदार राहिलो आणि शिवसेनेचे विधानपरिषद उमेदवार निवडून दिले. आम्ही दगाफटका केला नाही. पण शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतला तो बाळासाहेबांच्या राजकाराणातून आणि त्यांच्या विचाराचा वारसा पुढे चालवण्यासाठी घेतला. आणि आता आम्हाला लाभलेला जनसामान्यांना न्याय देणारा मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे. कारण आत्तापर्यंत लेना बँका बघितल्या पण महाराष्ट्रातील देना बँक म्हणजे शिंदे साहेब." असं म्हणत सत्तार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचं कौतुक केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.