काँग्रेस नेते अस्लम शेख यांना कॅनेडियन 'गँगस्टर'कडून जीवे मारण्याची धमकी

काँग्रेस नेते अस्लम शेख यांना कॅनेडियन 'गँगस्टर'कडून जीवे मारण्याची धमकी
Updated on

मुंबईः मुंबईतले काँग्रेसचे नेते तथा मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार अस्लम शेख यांना कथितपणे धमकी दिल्याचं प्रकरण समोर येत आहे. शेख यांना थेट कॅनेडियन गँगस्टरकडून जीवे मारण्याची धमकी आलीय.

गँगस्टर गोल्डी ब्रार बोलत असल्याचं सांगून एका कॉलरने अस्लम शेख यांना धमकी दिली. त्यानंतर त्यांनी रविवारी बांगुर नगर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. ब्रार ज्याला सतिंदरजीत सिंह या नावाने ओळखलं जातं, तो एक फरार कॅनेडियन गँगस्टर आहे.

काँग्रेस नेते अस्लम शेख यांना कॅनेडियन 'गँगस्टर'कडून जीवे मारण्याची धमकी
Supriya Sule: भाजपने फडणवीसांवर अन्याय केलाय, मला प्रचंड दु:ख वाटतं; सुप्रिया सुळेंचा टोला

गोल्डी ब्रार हा खतरनाक गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्याशी जवळीक ठेवून असल्याचं सांगितलं जातं. विशेष म्हणजे ब्रार याने यापूर्वी बॉलिवूड स्टार सलमान खानला धमकी दिली होती.

अस्लम शेख यांना धमकी मिळाल्यानंतर त्यांचे खासगी सचिव आणि वकील विक्रम कपूर यांनी एफआयआर दाखल केला आहे. तेच आमदार शेख यांचे मोबाईल कॉल्स उचलतात. तक्रारीनुसार कपूर यांना ५ ऑक्टोबर रोजी शेख यांच्या मोबाईलवर फोन आला होता.

काँग्रेस नेते अस्लम शेख यांना कॅनेडियन 'गँगस्टर'कडून जीवे मारण्याची धमकी
Maharashtra News : राज्यातील कारागृहांसाठी नव्याने 2 हजार पदनिर्मिती; नाशिकमध्ये नवीन प्रादेशिक कार्यालय

फोन करणाराने स्वतःला गोल्डी ब्रार असल्याचं सांगून अस्लम शेख यांना जीवे मारण्याची धमकी दिली. दोन दिवसांना त्यांना गोळी मारुन ठार करेन, हे अस्लम शेख यांना सांगा.. असं त्याने फोनवर म्हटलं. त्यानंतर बांगुर नगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.