Bacchu Kadu: 'सरकारने अंत पाहू नये, ....नाहीतर पुन्हा एकदा', बच्चू कडूंचा सरकारला इशारा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितल्या नंतर यावर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली
Bacchu Kadu
Bacchu KaduEsakal
Updated on

जालन्यामध्ये मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत आहेत. अनेक नेते आंदोलकांना भेटण्यासाठी जात आहेत. त्याचबरोबर काल (सोमवारी) मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. पण अद्याप तोडगा निघालेला नाही. आंदोलन सुरूच आहे. अशातचआमदार बच्चू कडू यांनी जालन्यातील घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. लाठीचार्ज ही अधिकाऱ्यांची बदमाशी असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

'त्याचबरोबर अभ्यास करुन सरकारने धनगर मुस्लिम आणि मातंग समाजाला देखील आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावायला हवा', असंही बच्चू कडू यावेळी बोलताना म्हणाले आहेत. जालन्यात झालेल्या लाठीचार्जवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची माफी देखील मागितली. त्यावर देखील बच्चू कडू यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Bacchu Kadu
Weather Update: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय! विदर्भासह 'या' भागात ऑरेंज अलर्ट

'जर माफी मागून राज्य शांत राहत असेल तर फार चांगलं आहे. लाठीचार्ज ही अधिकाऱ्यांची बदमाशी आहे, असं बच्चू कडू म्हणालेत. तर अधिकाऱ्यांनी लाठीचार्ज कसा केला? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांना बच्चू कडू यांनी पाठिंबा दिला आहे.

सरकारकडून उपोषणकर्ते मनोज जरांगेंची मनधरणी सुरू असतानाच आमदार बच्चू कडू यांनी जालना येथे जाऊन उपोषणकर्ते मनोज जरांगेंची भेट घेतली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, 'आमच्याकडून जितके प्रयत्न करता येतील तितके प्रयत्न आम्ही करु. सरकारने आंदोलकांकडे आंदोलन म्हणून पाहावे. पण इथे येणाऱ्यांना सेल्फीचं पडलं आहे. जरांगेंच्या आरोग्याचं काहीच पडलं नाही.'

Bacchu Kadu
मोठी बातमी! झेडपी शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या आता कायमच्या बंद; ‘पवित्र’द्वारे ३२ हजार शिक्षकांची भरती

'आज या लोकांनी जी ज्योत पेटवली आहे त्याचा सन्मान करणं हे महत्त्वाचे आहे. वेळ पडली तर मी देखील उपाशी राहण्यास मागे पुढे पाहणार नाही. त्यामुळे सरकारने अंत पाहू नये. नाहीतर पुन्हा एकदा सरकारचा अंत व्हायला वेळ लागणार नाही. तर महाराष्ट्रामध्ये मराठा कुणबी आहे ही काळ्या दगडावरची रेष आहे. त्यामुळे सरकाने वेगळा कायदा करण्याच्या भानगडीत पडू नका', असंही कडू यावेळी म्हणाले आहेत.

Bacchu Kadu
उजनीतून शेतीला पाणी सोडण्यासाठी १३ वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ निर्णयाचा अडसर! पंढरपूरला गुरुवारी तर सोलापूरसाठी १५ सप्टेंबरला पाणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.