Bacchu Kadu News
Bacchu Kadu Newsesakal

Bacchu Kadu: बच्चू कडू यांना मंत्रीपदाचा दर्जा! नाराजी दूर करण्याचा प्रयत्न?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार हा मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला
Published on

आमदार बच्चू कडू यांना मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार हा मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. बच्चू कडू यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही बोललं जात आहे.

बच्चू कडू यांना आता मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. राज्यात जून महिन्यात दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियान एकाच दिवशी राबवण्यात येणार आहे. यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राज्यस्तरीय समितीचे अध्यक्ष पद आणि प्रमुख मार्गदर्शक हे ही पद आमदार बच्चू कडू यांना दिलं जात आहे.

Bacchu Kadu News
Jayant Patil: "जयंत पाटील यांनी भाजपमध्ये येण्याचा प्रस्ताव नाकारल्यानेच ईडी चौकशी"

बच्चू कडू यांची नाराजी वारंवार दिसून येते. मंत्रिपद कधी मिळणार यावरूनही नाराजी व्यक्त केली जात होती. त्यानंतर आता बच्चू कडू यांना मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आलेला आहे. राज्यात जून महिन्यात दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी हे आभियान एकाच दिवशी राज्यभर राबवले जाणार आहे. त्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्षपद हे बच्चू कडू यांना दिलं आहे. दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष म्हणून बच्चू कडू यांची निवड करुन त्यांना मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे.

Bacchu Kadu News
Rahul Gandhi: राहुल गांधींची छत्रपती शिवरायांशी तुलना? भाजपने घेतली आक्रमक भूमिका

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार बच्चू कडू यांना मंत्री पदाचा दर्जा जाहीर करण्यात आला आहे. शासनाने यासंबधीचे परिपत्रक काढून बच्चू कडू यांना मंत्री पदाचा दर्जा जाहीर केला आहे. गेल्या वीस वर्षांपासून दिव्यांगांसाठी बच्चू कडू लढा लढत आहे. एक प्रकारे त्यांची नाराजी घालवण्याचा प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगु लागल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()